भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारी (9 फेब्रुवारी) सुरू झाला. मालिकेतील हा पहिला सामना सुरू असताना दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनी आगामी आयपीएल हंगामात खेळण्यासाठी तयारी करत असून यादरम्यानच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओत एमएस धोनी एखाद्या अस्सल शेतकऱ्यासारखा ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे.
एमएस धोनी (MS Dhoni) भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी 2020 मध्ये निवृत्त झाला असला, तरी नेहमीच चर्चेत असतो. भारताने धोनीच्या नेतृत्वात 2007 मघ्ये आयसीसीचा टी-20 आणि 20011 मध्ये वनडे विश्वचषक जिंकला आहे. तसेच 2013 साली त्याने संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली होती. धोनीचे वाहनांविषयीचे प्रेम कुणापासून लपून राहिले नाहीये. त्याच्याकडे एकापेक्षा एक चार चाकी आणि दोन चाकी वाहने आहेत.
त्याचसोबत धोनीला शेतीची देखील आवड आहे. राहत्या घरी म्हणजेच रांचीला धोनीने स्वतः अनेकदा शेती करताना दिसला आहे. बुधवारी (8 फेब्रुवारी) देखील त्याचा असाच एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये तो स्वतः ट्रॉक्टर चालवत आहे. स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून धोनीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहते या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. आपल्या आवडत्या क्रिकेपटूला सेतात नांगर चालवताना पाहून चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. अनेकांना धोनी आपल्यापैकीच एख असल्याचा प्रत्यय या व्हिडिओतून आला आहे.
https://www.instagram.com/reel/CoZwAtWo8vV/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, धोनी सध्या आयपीएल 2023 हंगामासाठी तयारी करत असल्याचेही सांगितले जात आहे. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच सीएसके आयपीएलचा दुसरा सर्वोत्तम संघ ठरला आहे. सीएसकेने आतापर्यंत चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. यादीत पहिल्या क्रमांकापल पाच आयपीएल ट्रॉफींसह मुंबई इंडियन्स आहे. आगामी आयपीएल हंगाम धोनीसाठी शेवटचा असू शकतो. धोनी त्याचे होम ग्राउंड रांचीमध्ये आयपीएलचा शेवटचा सामना खेळणार, असे स्वतः म्हटला होता. काही वर्षांपूर्वी म्हटलेली ही गोष्टी यावर्षी प्रत्यक्षात घडू शकते. (MS Dhoni plowing the farm with a tractor)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार भारताच्या कसोटी ताफ्यात सामील, ‘अशी’ आहे पहिल्या कसोटीसाठीची प्लेइंग इलेव्हन
आयसीसी रेटिंगमध्ये शुबमन गिलची मोठी झेप, हार्दिक लवकरच बनणार सर्वोत्तम अष्टपैलू