भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी हा डीआरएस घेण्यास माहीर आहे. डीआरएसला ‘धोनी रिव्ह्यू सिस्टम’ असेही चाहत्यांकडून धोनीचे कौतुक करताना म्हटले जाते. याचे खरे कारण म्हणजे ज्यावेळी पंचांकडून योग्य निर्णय घेण्यात चूक होते. त्यावेळी धोनीने घेतलेले जास्तीत जास्त डीआरएस हे यशस्वी ठरले आहे. याचे आणखी एक उदाहरण मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रविवारी (१९ सप्टेंबर ) इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला २० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, या सामन्यातील दुसऱ्या डावातील तिसऱ्या षटकात असे काही घडले होते, ज्यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, धोनीचे डीआरएस निर्णय अनेकदा अचूक असतात.
तर झाले असे की, दुसऱ्या डावात विजयासाठी मुंबई इंडियन्स संघाला १५७ धावांची आवश्यकता होती. दरम्यान, तिसरे षटक टाकण्यासाठी दीपक चाहर गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिलाच चेंडू क्विंटन डी कॉकच्या पॅडला जाऊन लागला होता. गोलंदाजाने विकेटसाठी जोरदार मागणी केली. परंतु, पंचांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर काही क्षणातच धोनीने डीआरएस घेण्याची मागणी केली. हा इशारा करताच क्विंटन डी कॉकला ही खात्री पटली होती की तो बाद आहे.
डीआरएस घेतला असता, स्पष्टपणे दिसून येत होते की, चेंडू यष्टीला जाऊन धडकतोय. त्यामुळे तो बाद होऊन माघारी परतला.
DRS king👑 Dhoni Review system🔥 #WhistlePodu @ChennaiIPL @msdhoni pic.twitter.com/TBWCbfeTWE
— Arman Sharief_07 (@arman_sharief) September 20, 2021
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, चेन्नई सुपर किंग्सला सामन्याची सुरुवात चांगली करता आली नाही. पण नंतर ऋतुराज गायकवाडने केलेल्या ८८ धावांच्या खेळीमुळे त्यांनी ६ बाद १५६ धावांपर्यंत मजल मारली आणि मुंबईसमोर विजयासाठी १५७ धावांचे आव्हान ठेवले. पण मुंबईला ८ बाद १३६ धावाच २० षटकांअखेर करता आल्या. त्यामुळे चेन्नईने हा सामना २० धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
भोगा फळं…! न्यूझीलंडनंतर इंग्लंडचाही पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दणका; थेट दौराच रद्द
‘मिस्टर ३६०’ च्या नावे नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ गोलंदाजांनी डिविलियर्सला केलंय ‘गोल्डन डक’वर बाद
अरं काय रे हे आरसीबी! तब्बल ‘इतक्यांदा’ ओढवलीय १०० पेक्षा कमी धावांत बाद होण्याची नामुष्की