चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात धावबाद झाला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात धोनी 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, आयपीएल 2024 मध्ये महेंद्रसिंह धोनी प्रथमच बाद झाला आहे. यापूर्वी तो 7 डावात नाबाद परतला होता. एमएस धोनीनं या हंगामात शेवटच्या काही षटकांमध्ये अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत. परंतु पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात तो काही आपली जादू दाखवू शकला नाही.
महेंद्रसिंह धोनी पंजाब किंग्जविरुद्ध 11 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान त्यानं 1 चौकार आणि 1 षटकार मारला. धोनीचा स्ट्राइक रेट केवळ 127 होता, जो चालू हंगामातील सर्वात कमी आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड 18व्या षटकात बाद झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी क्रीजवर आला. त्यानं 11 पैकी 5 चेंडू डॉट्स खेळले. 19व्या षटकात धोनीनं चार चेंडूंचा सामना केला, ज्यावर त्याला केवळ दोन धावा करता आल्या.
शेवटच्या षटकात एमएस धोनीनं पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. यानंतर तीन चेंडूंवर एकही धाव निघाली नाही. या दरम्यान धोनीला एक धाव घेण्याची संधी होती, परंतु त्यानं डॅरिल मिशेलला स्ट्राईक देण्यास नकार दिला. मिशेल धोनीपर्यंत धावत जाऊन वापस परतला. येथे धोनी पळाला असता तर एक धाव सहज निघाली असती. मात्र धोनीनं एकही धाव घेतली नाही.
धोनीच्या असं करण्यानं चाहते थोडे आश्चर्यचकित झाले होते. समालोचन करणाऱ्या इरफान पठाणनही यावरून धोनीबद्दल नाराजी व्यक्त केली. धोनीनं पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर धोनी दोन धावा चोरण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. अशाप्रकारे महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या चालू हंगामात प्रथमच बाद झाला आहे आणि तोही धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
महत्त्वाच्या बातम्या –
36 वर्षाच्या खेळाडूनं आयपीएलमध्ये पदार्पण करून रचला इतिहास! चेन्नईच्या प्लेइंग 11 मध्ये मिळाली जागा
आयपीएलच्या दोन ‘किंग्ज’ची लढत, पंजाबनं जिंकला टॉस; जाणून घ्या प्लेइंग 11
मयंक यादव पुन्हा जखमी झाल्यानं संतापला ब्रेट ली, लखनऊच्या मॅनेजमेंटला धरलं जबाबदार