भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी शुक्रवार, 7 ऑक्टोबर चेन्नईत दाखल झाला. आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करत अशता. सोशल मीडियावर देखील त्याचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच व्हायरल होताना दिसतात. अशात चेन्नईच्या विमानतळावर धोनी दिसल्यानंतर त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एमएस धोनी (MS Dhoni) भारतीय संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. भारताला टी-20 आणि एकदिवसीय अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये विश्वचषक जिंकवून देणारा धोनी एकमेव कर्णधार देखील आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने एकूण चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनी चेन्नईच्या सराव सत्रात सहभागी होण्यापूर्वी, आयपीएलच्या लिलावापूर्वी किंवा आयपीएल हंगामा सुरू होण्यापूर्वी अनेकदा चेन्नईचा दौरा करतो, हे यापूर्वी पाहिले गेले आहे. शुक्रवारी तो पुन्हा एकदा चेन्नईच्या विमानतळावर दिसला. चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून धोनीचा हा फोटो शेअर केला गेला आहे.
Touchdown Anbuden! Unexpected #ThalaDharisanam to make our day! 🦁💛#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/pckvhqSnT8
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 7, 2022
चेन्नईच्या विमानतळावरून धोनी जेव्हा बाहेर येत होता, तेव्हाचे त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी त्याने पाढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि चेहऱ्यावर काळ्या रंगाचे मास्क घातले होते. मागच्या तीन वर्षांपासून धोनी आयपीएलमध्ये सहभाग घेण्यापूर्वी चेन्नईचा दौरा कत आला आहे. आता चेन्नईतील चाहत्यांना पुम्हा एखदा त्याला पाहण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी धोनी भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर देखील एकत्र दिसले होते. माहितीनुसार हे दोन दिग्गज एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी एकत्र आले होते. यावेळी दोघांना एकमेकांसोबत टेनिस खेळताना आणि चर्चा करताना दिसला. काही दिवसांपूर्वी धोनी आणि युवराज यांनीही एकत्र एक जाहिरात शुट केली होती. आयपीएल 2022 मध्ये धोनी पुन्हा एकदा सीएसकेचे नेतृत्व करणार असल्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दीपक चाहरच्या जागी ‘याची’ संघात एंट्री
विश्वचषकाच्या तोंडावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूवर कारवाई, चार वर्षांसाठी झाले निलंबन; वाचा संपूर्ण प्रकरण