---Advertisement---

काय सांगता! चक्क धोनीनेच लावली बांगलादेशची फिल्डींग, पहा व्हिडिओ

On: बुधवार, मे 29, 2019 12:35 PM
---Advertisement---

कार्डिफ। भारत विरुद्ध बांगलादेश संघात मंगळवारी 2019 विश्वचषकापूर्वी सराव सामना पार पडला. या सामन्यात भारताने 95 धावांनी विजय मिळवला. भारताकडून या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आणि केएल राहुलने शतकी खेळी केल्या.

धोनीने 78 चेंडूत 113 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार मारले. तर राहुलने 99 चेंडूत 108 धावांची खेळी करताना 12 चौकार आणि 4 षटकार मारले. या दोघांनी 164 धावांची पाचव्या विकेटसाठी भागीदारीही रचली. पण हे दोघे फलंदाजी करत असताना एक अनपेक्षित घटना पहायला मिळाली.

झाले असे की 40 व्या षटाकात बांगलादेशकडून सब्बीर रेहमान गोलंदाजी करत होता. यावेळी धोनी 60 धावांवर फलंदाजी करत होता. त्याचवेळी बांगलादेशच्या क्षेत्ररक्षणात काहीतरी चूक असल्याचे धोनीच्या लक्षात आले.

त्यामुळे त्याने फलंदाजी करण्यापासून मागे हटत सब्बीर रेहमानला एक क्षेत्ररक्षक चूकीच्या ठिकाणी उभा असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर सब्बीरने हसून लगेचच त्या क्षेत्ररक्षकाला तेथून हलण्यास सांगितले. या घटनेनंतर समालोचकांसह सर्वांनाच हसू आले.

समालोचकांच्या म्हणण्यानुसार बांगलादेशचा क्षेत्ररक्षक चूकीच्या जागी उभा होता. त्यामुळे धोनी गोंधळात पडला. त्या क्षेत्रकक्षकाने शॉर्ट स्क्वॉरिश फाईन लेगला उभे राहणे अपेक्षित होते. पण तो चूकीच्या बाजूला उभा होता.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच ट्विटरवर धोनीच्या या खिलाडूवृत्तीबद्दल अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

https://twitter.com/devame207/status/1133624918711656448

या सामन्यात धोनी आणि राहुलने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 359 धावांचा टप्पा गाठला. भारताकडून धोनी, राहुलबरोबरच विराटने 47 धावांची चांगली खेळी केली.

बांगलादेशकडून गोलंदाजीमध्ये रुबेल हुसेन आणि शाकिब अल हसनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर रेहमान, मोहम्मद सैफुद्दीन आणि सब्बीर रेहमानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

यानंतर 360 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशला 49.3 षटकात सर्वबाद 264 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून मुशफिकुर रहिम(90) आणि लिटॉन दासने(73) अर्धशतकी खेळी केल्या.

भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादव, युजवेंद्र चहलने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराहने 2 आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

https://www.instagram.com/p/ByB6GqHlkNu/

https://twitter.com/djprithviindia/status/1133373376674684932

https://twitter.com/djpershad/status/1133359694725017601

https://twitter.com/broken602/status/1133359506136522754

https://twitter.com/Dorkstar/status/1133358955072086016

https://twitter.com/prdpkaushik86/status/1133582533038301184

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीने षटकार मारत पूर्ण केले शतक; कर्णधार कोहलीची आली अशी प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ

केएल राहुल, एम धोनीचा शतकी धमाका, टीम इंडियाने बांगलादेश समोर उभा केला धावांचा डोंगर

या गमतीशीर कारणामुळे कोहलीचे विश्वचषक जिंकणे कठीण, वाचा काय आहे ते कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment