भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने मागीलवर्षी जूनमध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने २००० साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला. त्याने खेळलेल्या कर्णधारांपैकी बोलताना युवराजने मोठा खूलासा केला आहे.
त्याने म्हटले आहे की ज्याप्रमाणे गांगुलीने त्याला पाठिंबा दिला तसा पाठिंबा एमएस धोनी किंवा विराट कोहली यांनी दिला नाही.
स्पोर्ट्सस्टार पॉडकास्ट दरम्यान बोलताना युवराज म्हणाला, ‘मी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळलो आणि मला त्याच्याकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्यानंतर माही (धोनी) कर्णधार झाला. सौरव आणि माहीमधील एकाला निवडणे कठिण आहे. सौरवच्या नेतृत्वाखाली खेळताना माझ्या अनेक आठवणी आहेत, कारण मला त्याने खूप पाठिंबा दिला. त्याप्रमाणे मला माही आणि विराटकडून पाठिंबा मिळाला नाही.’
याबरोबरच २००० च्या १९ वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग असणाऱ्या युवराजने असेही सांगितले की खेळाडूंची पुढची पिढी घडवताना चांगल्या प्रशिक्षकाचे महत्त्व खूप असते. योग्य मार्गदर्शन जर मिळाले तर हे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करु शकतात.
युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०२ सामने खेळले असून १७ शतकांसह ११७७८ धावा केल्या आहेत. तसेच १०० हून अधिक विकेट्स घेतले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
सर्वाधिक वनडे सामन्यात पराभव पाहणारे ५ क्रिकेटर
सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे जगातील २ दिग्गज, एक आहे भारतीय
पराभुत वनडे सामन्यात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे ५ फलंदाज