भारतीय संघाचा माजी कर्णधार व चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी आयपीएलचे पुढील ३ हंगाम खेळण्याची शक्यता आहे. त्याने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सोडले तरीही तो आयपीएल खेळत रहाण्याची शक्यता आहे.
२०२०चा आयपीएलचा १३वा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. धोनी या हंगामाची जोरदार तयारी करत होता. परंतु हा हंगाम कधी होईल याची कोणतीही शाश्वती नाही. टी२० विश्वचषकात धोनीला स्थान मिळणे जवळपास २०२० आयपीएलवरच अवलंबुन होते. त्यामुळे त्याचे भारतीय संघातील स्थान सध्यातरी डळमळीत आहे.
“धोनीने त्याच्या जवळच्या मित्रांना तो आयपीएलचे अजून तीन हंगाम अर्थात २०२२ पर्यंत खेळणार आहे. त्याला वैयक्तितरित्या आयपीएल खेळायला आवडते व तसेच या स्पर्धेचे स्वरुप हे धोनीला चांगले वाटते. त्याने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून राजीनामा घेतला तरी तो आयपीएलमध्ये त्याला राजीनाम्यानंतरही कारकिर्द घडवायची आहे,” असे धोनीच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे.
“धोनीला त्याचे राज्य झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रिकेटचा प्रसार करायचा आहे, म्हणून तो सध्या त्याचाही विचार करत आहे. धोनीला कशाचीही घाई नसते. त्यामुळे त्याच्या डोक्यात कितीही कल्पना असल्या तरी तो योग्य वेळ व खात्री केल्याशिवाय त्या अंमलात आणतं नाही,” असेही ती व्यक्ती स्पोर्ट्सकीडाशी बोलताना पुढे म्हणाली.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वनडेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ महान गोलंदाज
-जो विक्रम भारताच्या नावावर हवा होता तो आहे पाकिस्तानच्या नावावर
-भारतीय संघातील या खेळाडूमुळेच केदार खेळू शकला एवढे वनडे सामने