भारतात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा विळखा पडला आहे. अगदी गोर-गरींबापासून ते मोठ्या सेलिब्रेटींपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात नुकतेच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी याच्या कुटुंबीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचे आई आणि वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
माध्यमांतील अहवालानुसार, धोनीचे वडील पान सिंग धोनी आणि आई देवकी देवी यांना कोविड-१९ चे संक्रमण झाले आहे. त्यानंतर त्यांना रांचीमधील बरियातू रोड स्थित पल्स हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
MS Dhoni's mother Devaki and father Pan Singh admitted to private hospital in Ranchi
Dhoni's parents have tested positive for Covid-19
Please Praying 🙏 for speedy recovery#MSDhoni @msdhoni pic.twitter.com/GFjDSiRCzp
— hmm… (@ForeverVashi) April 21, 2021
धोनीच्या आई-वडिलांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे की, ‘त्यांची स्थिती सामान्य आहे. दोघांचीही शरीरातील ऑक्सिजन पातळी संतुलित आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण त्यांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे लवकरच त्यांचे स्वास्थ बरे होण्याची अपेक्षा आहे.’
यष्टीरक्षक फलंदाज धोनी सध्या आयपीएल २०२१ मध्ये व्यस्त आहे. नुकताच (१९ एप्रिल) मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला हंगामातील बारावा सामना त्याने जिंकला होता. हा त्याचा कर्णधार म्हणून आयपीएलमधील २०० वा सामना होता. धोनीबरोबर त्याची साक्षी आणि मुलगी झिवा हेदेखील चेन्नईत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हा तर विराटच्याही पुढचा निघाला! रिषभ पंतच्या ‘त्या’ कृत्यावर चाहत्यांच्या उमटल्या भन्नाट प्रतिक्रीया