‘१९८३’ आणि ‘२०११’ या २ वर्षांची भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे, या २ वर्षात भारताने आयसीसी विश्वचषकात विजेतेपद पटकावले होते. १९८३मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. त्यानंतर तब्बल २८ वर्षांनंतर भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावण्याचा मान मिळवला होता.
धोनीच्या या शानदार यशामुळे त्याला भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते. शिवाय धोनीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रमांची नोंद केली आहे. मात्र, या यष्टीरक्षक फलंदाजाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये देखील नोंद आहे. याचे कारण अजून काही नसून २०११ सालच्या विश्वचषकातील विजयी षटकार हे आहे.
धोनीने २०११मधील भारत विरुद्ध श्रीलंका संघातील अंतिम सामन्यात दमदार षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे धोनीची गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे. कारण त्याने ज्या बॅटने तो षटकार मारला होता. ती बॅट आज जगातील सर्वात महागडी बॅट आहे.
भारतातील आर के ग्लोबल अँड सेक्युरिटी लिमिटेड कंपणीने धोनीच्या त्या बॅटला लाखो डॉलरला विकत घेतले होते. तब्बल १ लाख ६१ हजार २९५ डॉलर इतकी त्या बॅटची किंमत लावण्यात आली होती. धोनीच्या त्या विजयी षटकारामुळे त्याच्या बॅटला इतकी मोठी रक्कम मिळाल्याने त्याच्या नावाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
ऑस्ट्रेलियात होणारा ‘तो’ कसोटी सामना जिंकणे टीम इंडियासाठी केवळ अशक्य
क्रिकेटमध्ये असा ‘बाप’ योगायोग ना कधी पुन्हा झाला, ना कधी पुन्हा होईल!
भारताला चँपियन बनवणारा प्रशिक्षक म्हणतोय, मला परत टीम इंडियासोबत काम करायचंय