मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ५९ वा सामना गुरुवारी (१२ मे) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. कमी धावसंख्येचा झालेला हा सामना मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने जिंकला. असे असले तरी, या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा युवा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी याने चांगल्या कामगिरीसह सर्वांचे लक्ष वेधले.
या सामन्यात चेन्नईने मुंबईला ९८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने पहिल्या ५ षटकातच ४ विकेट्स गमावल्या होत्या. यातील तीन विकेट्स मुकेश चौधरीने घेतल्या होत्या त्याने मुंबई इंडियन्सच्या डावातील पॉवरप्ले संपण्यापूर्वी म्हणजेच ६ षटकांच्या आत इशान किशन, डॅनिएल सॅम्स आणि ट्रिस्टन स्टब्स यांना बाद केले. त्यामुळे आता त्याच्या आयपीएल २०२२ हंगामात पॉवरप्लेमध्ये ११ विकेट्स झाल्या आहेत.
त्याचमुळे आता आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने गुजरात टायटन्सकडून मोहम्मद शमीला मागे टाकले आहे. शमीने १० विकेट्स आयपीएलच्या १५ व्या हंगामात पॉवरप्लेच्या षटकांमध्ये घेतल्या आहेत.
तरी, शमीला या यादीत पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याची संधी असणार आहे, कारण गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे, तसेच त्यांचे अजून २ साखळी सामने बाकी आहेत, तर चेन्नईचे आव्हान संपुष्टात आले असून त्यांचे केवळ २ साखळी सामने बाकी आहेत (Most wickets in Powerplay in IPL 2022).
मुकेश चौधरी यंदा चेन्नई सुपर किंग्ससाठी यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने ड्वेन ब्रावोसह संघासाठी सर्वाधिक १६ विकेट्स घेतल्या आहेत. ब्रावोने देखील यंदा १६ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल २०२२ मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (१२ मे २०२२ पर्यंत)
११ – मुकेश चौधरी
१० – मोहम्मद शमी
८ – कागिसो रबाडा
८ – उमेश यादव
७ – दुश्मंता चमिरा
७ – प्रसिद्ध कृष्णा
मुंबईचा विजय
गुरुवारी झालेल्या या सामन्यात (CSK vs MI) प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची फलंदाजी निराशाजनक राहिली. केवळ एमएस धोनीने (MS Dhoni) ३० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने नाबाद ३६ धावा करताना चेन्नईला ९७ धावापर्यंत पोहचवले. त्यानंतर ९८ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने १४.५ षटकात पूर्ण केले. मुंबईकडून सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. चेन्नईकडून चौधरीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईविरुद्धच्या पराभवानंतरही ‘या’ गोष्टीमुळे धोनी खुश; वाचा काय म्हणाला
प्लेऑफची आशा जिवंत, पण विजयाची आशा धूसर; कोलकाताचा हुकमी एक्का आयपीएलमधून आऊट
चेन्नई विरुद्ध ‘कॅप्टन’ रोहित ‘हिट’! कर्णधारांच्या ‘या’ यादीत अन्य कोणी जवळपासही नाही






