कोरोना महामारीमुळे स्थगित झालेल्या पाकिस्तान प्रीमिअर लीग म्हणजेच पीएसएलचा थरार पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवायला मिळत आहे. संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये पीएसेलचे उर्वरित सामने खेळवले जात आहे. दिवसेंदिवस या स्पर्धेचा रोमांच वाढतांना दिसून येत आहे.
या स्पर्धेत 16 जून रोजी झालेल्या सामन्यात मुलतान सुलतान संघाने क्वेटा ग्लॅडियेटर संघाचा 110 धावांनी पराभव केला. यासह त्यांनी क्वेटा ग्लॅडियेटर संघाला पीएसेलच्या प्लेऑफ शर्यतीतून बाहेर फेकले आहे. सलामीवीर फलंदाज शान मसूदने 42 चेंडूत 73 धावा करीत मुलतान संघाला 183 धावांपर्यंतच पोहोचवले होते.
इमरान ताहीरचे 3 बळी
त्यानंतर लेगस्पिनर इमरान ताहीरने फक्त 7 धावा देत 3 बळी घेतले. ज्यामुळे क्वेटाचा संपूर्ण संघ 12.1 षटकात 73 धावांवर गारद झाला. क्वेटा संघाचे दोन प्रमुख खेळाडु फाफ डु प्लेसिस आणि आंद्रे रसेल या सत्राच्या सुरवातीलाच दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर मोठा फरक पडला आहे.
मसूदच्या आक्रमक फलंदाजीमुळे मुलतान सुलतानच्या संघाने या सामन्यात मोठे लक्ष्य उभे केले. मसूदने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकार लगावले. आणि त्यानंतर जॉन्सन चार्ल्सने 24 चेंडूत 47 धावा करत त्याला सुयोग्य साथ दिली.
मुलतानचे 8 सामन्यांत 8 गुण
आता मुलतान सुलतान संघांचे आठ सामन्यांत आठ गुण झाले आहेत. इस्लामाबाद युनायटेडचा संघ 12 गुणांसह प्लेऑफसाठी अगोदरच पात्र ठरला आहे. पेशावर जल्मि आणि लाहोर कलंदर्स संघाचे प्रत्येकी 10 गुण आहेत. तर गटविजेता कराची संघ सहाव्या क्रमांकावर आहे.
कोरोना महामारीमुळे स्थगित झालेली आयपीएल स्पर्धा देखील सुरू होणार असून त्याविषयीची अधिकृत घोषणा बीसीसीआयने केली आहे. आयपीएलचे दुसरे सत्र देखील युएई मध्ये सुरू होणार आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जातील.
महत्वाच्या बातम्या
“धोनी माझ्यासाठी देवासमान, त्याच्याशी तुलना करू नका”
आयसीसीने केले विराटच्या एक्सप्रेशन्सचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी ट्विटरवर अशाप्रकारे उडवली थट्टा
सलग दोन विजयांसह युरो कप २०२० च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला इटली