‘ब’ गटातील दुसऱ्या दिवशी पहिली लढत मुंबई शहर मौर्य मेवरीक्स व रत्नागिरी अरावली ॲरोज यांच्या लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीलाच मुंबई शहरच्या चढाईपटूंनी आक्रमक चढाया करत रत्नागिरी संघावर लोन पाडला. राज आचार्यच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर मुंबई शहर ने आघाडी मिळवली.
मध्यंतरा पर्यत 29-13 अशी आघाडी मुंबई शहर कडे होती. राज आचार्य ने सुपर टेन करत महत्वाची भूमिका निभावली. त्याला साहिल राणे, साई चौगुले यांनी चांगली साथ दिली. तर कर्णधार हर्ष लाड ने चांगल्या पकडी करत संघाला आघाडी मिळवून दिली. रत्नागिरी कडून बदली खेळाडू म्हणून आलेल्या भूषण गुढेकर ने जबरदस्त पकडी करत हाय फाय पूर्ण केला.
मुंबई शहर ने 45-26 असा विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसरा विजय साजरा केला. मुंबई शहर कडून राज आचार्य ने सर्वाधिक 11 गुण मिळवले. तर साहिल राणे चढाईत 5 तर पकडीत 4 गुण मिळवत अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. तर कर्णधार हर्ष लाड ने 4 पकडी केल्या. रत्नागिरी कडून साहिल माने ने 8 गुण मिळवले तर भूषण गुढेकर ने 6 पकडी केल्या.
बेस्ट रेडर- राज आचार्य, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
बेस्ट डिफेंडर्स- भूषण गुढेकर, रत्नागिरी अरावली ॲरोज
कबड्डी का कमाल- साहिल राणे, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
(Mumbai City Maurya Mavericks second win in a row)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घरच्या मैदानावर राहुलने गमावला टॉस, हैदराबाद करणार बॅटिंग, ‘या’ दोन अनुभवी खेळाडूंचा लखनऊमध्ये डेब्यू
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या ‘ब’ गटात पहिल्या दिवशी संमिश्र निकाल