मुंबई । कोविड-१९ मुळे लावण्यात आलेल्या ३ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर राज्य शासनाने खेळाडूंच्या सरावासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्व जारी केली पाहिजेत, अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सध्या मुंबईतील काही खेळाडूंनी सराव करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये रोहित शर्माचाही समावेश आहे, ज्याने एकदिवसापूर्वीच आऊटडोअर प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे.
काही काळापूर्वी शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) सरावामुळे बीसीसीआयने (BCCI) नाराजी व्यक्त केली होती. परंतु रोहितचे आता खुल्या मैदानात सराव करणेही आश्चर्यकारक म्हटले जाते आहे. कारण मुंबईमध्ये कोविड-१९ (Covid-19) च्या प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत आहे. या गोष्टीमुळेच एमसीए नाराज आहे.
एमसीएचे सचिव संजय नायक आणि संयुक्त सचिव शाह आलम शेख यांनी पत्राद्वारे अपील केली, ज्यामध्ये त्यांनी लिहिले, “क्रिकेट संचालन संस्था असल्याच्या नात्याने आम्ही सरकारच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आणि आम्ही भविष्यातही असे करत राहू.”
“परंतु त्याचबरोबर आम्हाला हेदेखील समजून घ्यावे लागेल, की हजारो खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी आणि आपली कारकीर्द घडविण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ते या विषाणूच्या नष्ट होण्याची वाट पाहत आहेत. तरीही असे वाटत आहे, की आपल्या सर्वांना या विषाणूबरोबरच रहावे लागेल,” असेही त्यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले.
या असाधारण परिस्थितीत एमसीए (MCA) राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने सराव सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे मागत आहे. एमसीएने लिहिले, “या असाधारण काळात क्रिकेट सुरु करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे किंवा मानक कार्यप्रणाली पुरवाव्या, अशी आमची इच्छा आहे. आम्ही सर्व खेळाडूंना सूचना देऊ, जेणेकरून ते शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतील.”
त्यामुळेच रोहितच्या (Rohit Sharma) जोखिम घेण्याबाबत काळजीत आणि नाराज असणाऱ्या एमसीएने आऊटडोअर प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबद्दल म्हटले आहे. म्हणजेच कोणत्या काळात खेळाडू सराव करू शकतात.
आता या प्रकरणात शार्दुल ठाकूरच्या प्रकरणासारखीच दखल बीसीसीआय घेणार का हे पहावे लागले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-१ जानेवारी २०१५ रोजी आयसीसी क्रमवारीत टाॅप १०मध्ये असलेले खेळाडू आज मात्र
-होय आम्ही भूत पाहिले! भूत पाहिल्याचा दावा करणारे जगातील ५ क्रिकेटर्स
-आठवणीतील बॅट- ५ भारतीय क्रिकेटपटूंच्या बॅट व त्यावरील खास स्टिकर्स