मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी संघात आज (दि. 11 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय संपादित केला आहे. आयपीएल 2024 मधला हा 25वा सामना होता. बंगळुरु संघाने प्रथम फलंदाजी केल्यानंतर दिलेलं 197 धावांचे आव्हान मुंबईने अगदी सहजरित्या पेलले. 7 विकेट्स आणि 27 चेंडू राखून मुंबईने 199 धावा करत बंगळुरूला चारीमुंड्या चीत केले. यासह मुंबईने आयपीएल 2024 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. ( Mumbai Indians beat Royal Challengers Bengaluru by seven wickets in IPL )
सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या नावावर फक्त 1-1 विजय होता. त्यामुळे दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या आशेने मैदानावर उतरले होते. परंतू यात मुंबईला यश मिळाले असून मुंबई इंडियन्सने सांघिक कामगिरीच्या जोरावर स्पर्धेतील दुसरा विजय मिळवत आपले स्थान बळकट केले आहे. अगोदर गोलंदाजीत बंगळुरुच्या फलंदाजीला जसप्रीत बुमराहने खिंडार पाडले. बुमराहने बळींचे पंचक पूर्ण केले. त्यानंतर फलंदाजीत इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांनी वादळी अर्धशतके केली आणि कर्णधार हार्दिक पांड्याच्या पुरक खेळीने मुंबईचा विजय सोप्पा झाला.
बंगळुरुकडून कर्णधार फाफ डू प्लेसीस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी चांगली फलंदाजी करत संघाला बळकट धावसंख्या उभारून दिली. परंतू आरसीबीच्या गोलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. आरसीबीचे सर्वच गोलंदाज महाग ठरले. बदल्यात मुंबईच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली. एकट्या बुमराहने 5 विकेट्स घेत कमी धावा दिल्या. त्यानंतर फलंदाजीत रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी शतकी सलामी दिल्याने मुंबईचा विजयाचा मार्ग सोप्पा बनला.
थांबायचं नाय आता थांबायचं नाय 🙌#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvRCBpic.twitter.com/VOmkpnYqjy
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2024
A masterclass with the ball👌👌@Jaspritbumrah93 is awarded Player of the Match for his fabulous 5️⃣-wicket haul as @mipaltan win by 7 wickets against #RCB
Scorecard ▶️ https://t.co/Xzvt86cbvi#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/O16kOGtwcE
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
अधिक वाचा –
– राजस्थान आणि गुजरात यांच्यातील सामन्यात घडली गंभीर गोष्ट, कर्णधार शुबमन गिल थेट पंचांवर धावला? जाणून घ्या नक्की काय घडलं – Video
– RCB सोबतच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल, ‘या’ वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची संघात एन्ट्री । IPL 2024
– मोठी बातमी! आयपीएल दरम्यान हार्दिक पांड्याच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, भावानेच केली भावाची फसवणूक