---Advertisement---

राजस्थान आणि गुजरात यांच्यातील सामन्यात घडली गंभीर गोष्ट, कर्णधार शुबमन गिल थेट पंचांवर धावला? जाणून घ्या नक्की काय घडलं – Video

---Advertisement---

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात बुधवारी (दि. 10 एप्रिल) झालेल्या सामन्यात राजस्थान संघाचा पराभव झाला. राजस्थानच्या 196 धावांचे आव्हान गुजरातने 20 षटकात पुर्ण केले. परंतू राजस्थानच्या फलंदाजांनी केलेल्या फलंदाजीमुळे काहीकाळ गुजरात संघ धोक्यात आला होता, हेही नक्की. ( Shubman Gill vents out anger on umpire over wide ball review fiasco Watch Video )

राजस्थानने धावांचा डोंगर उभारण्यात कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग या दोघांचा वाटा मोलाचा होता. संजूने 38 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 68 धावांची खेळी केली. तर रियान परागने 48 चेंडूत 76 धावा केल्या. त्यात त्यानं 5 षटकार आणि 3 चौकार मारले. याच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या गुजरात टायटन्ससाठी शुबमन गिलच्या 72 धावांचं योगदान महत्त्वाचं राहिल. तसेच हा सामना गुजरातनं 3 विकेट्सनं विजय मिळवला. परंतू या सामन्यात राजस्थानचे खेळाडू फलंदाजी करत असताना 17व्या षटकात एक गंभीर प्रकार घडला. रागाचा पारा चढलेला कर्णधार शुबमन गिल थेट पंचांवर खेचकला.

काय घडलं 17व्या षटकात
राजस्थान रॉयल्सचे खेळाडू फलंदाजी करत असताना मोहित शर्मा 17वी ओव्हर टाकत होता. त्यानं ओव्हरचा शेवटचा चेंडू कमी गतीने फेकला. जो खेळाताना संजू ऑफ-स्टम्पच्या थोडा बाहेर उभा होता. तरीही तो चेंडू त्याला खेळता आला नाही. परंतू तो चेंडू वाईड रेषेच्या अगदी जवळून गेला. आणि त्या चेंडूला पंचांनी वाईड दिला. पण गुजरातचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेड च्या सुचनेने गुजरातने DRS घेतला.

थर्ड अंपायरने प्रथम त्या चेंडूला योग्य घोषित केले, परंतू पुन्हा पाहताना अंपायरने मोहितच्या चेंडूला वाईड सांगितले. हा सर्व प्रकार पाहून कर्णधार शुबमन गिल प्रचंड भडकला. त्याने आपला राग अंपायरकडे जाऊन व्यक्तही केला. पण शेवटी तो चेंडू वाईड म्हणूनच घोषित करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---