इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) २०२१ चा उर्वरित हंगाम १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे पार पडणार असल्याचे रविवारी (२५ जुलै) बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने उर्वरित आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले असून १९ सप्टेंबरला आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात दुबई येथे पार पडणार आहे. हे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चेन्नई संघाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
चाहत्यांच्या आल्या मजेदार प्रतिक्रिया
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स उर्वरित सांगा माझ्या पहिल्या सामन्यात समोरासमोर येण्याचे नक्की झाल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांनी मजेदार मीम शेअर केले. एका चाहत्याने शेअर केलेल्या मीममध्ये मुंबईचा उपकर्णधार कायरन पोलार्ड हातात काठी घेऊन उभा आहे आणि चेन्नईचे खेळाडू बसलेले दिसतायेत. अन्य एका मीममध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या पायाशी बसलेला दाखवला आहे.
https://twitter.com/Vaibhavkav/status/1419258546168889345
https://twitter.com/TNROfficial_/status/1419254261783810051
पहिल्या सामन्यात झाला आहे चेन्नईचा पराभव
आयपीएल २०२१ मध्ये उभय संघांत १ मे रोजी झालेल्या सामन्यात मुंबईने २१९ धावांचे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर पार केले होते. या सामन्यात पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांची तुफानी खेळी केली होती. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांना आयपीएलमधील सर्वात मोठे विरोधक मानले जाते.
https://twitter.com/Mr_hypo_thetic/status/1419528203715059714
https://twitter.com/Faffort1/status/1419310483216109570
कोरोनामुळे स्थगीत केला गेलेला हंगाम
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलचा चौदावा हंगाम मे महिन्यात कोरोना महामारीमुळे स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने उर्वरित आयपीएल युएई येथे आयोजित करण्याचे नक्की केले होते. युएईत आयपीएल आयोजित होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१४ मध्य भारतात लोकसभा निवडणुका असल्याने काही सामने युएई येथे खेळविण्यात आले होते. त्यानंतर, २०२० साली भारतात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने संपूर्ण हंगाम युएईत खेळला गेला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तर, मी असो किंवा अन्य कोणी, तुम्हाला संघाबाहेर बसावेच लागेल’, चहलचे मोठे भाष्य
महिला हॉकी सामन्यात जर्मनीने भारताला पाजलं पराभवाचं पाणी; बुधवारी ब्रिटनला देणार आव्हान