अखेर इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाला विजेता संघ गवसला. मंगळवारी (१० नोव्हेंबर) दुबईमध्ये झालेल्या आयपीएल २०२०च्या अंतिम लढतीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५ विकेट्सने स्वप्नभंग केला. यामुळे मुंबईने पाचव्यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. एवढेच नव्हे तर, मुंबईने सलग दुसऱ्या वर्षी ट्रॉफी जिंकली आहे.
आयपीएल २०१३, हेच ते वर्ष होते जेव्हा मुंबईने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी पटकावली होती. त्यानंतर एका वर्षाच्या फरकाने म्हणजेच २०१५, २०१७ आणि २०१९ असे मुंबईने विजेतेपद पटकावले होते. परंतु, यावर्षी पुन्हा एकदा मुंबईने ट्रॉफीवर आपले नाव कोरले आणि एकामागोमाग सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान मिळवला.
यासह आयपीएलच्या इतिहासात सलग २ वेळा विजेतेपद जिंकणारा मुंबई दुसराच संघ ठरला आहे. त्यांच्यापुर्वी फक्त चेन्नई सुपर किंग्स संघाने सलग २ वर्षे विजेतेपद मिळवण्याचा कारनामा केला आहे. २०१० आणि २०११ या सलग २ वर्षात चेन्नईने ट्रॉफी जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
स्पर्धेअखेर संघ आणि खेळाडू मालामाल; पाहा कुणाला किती रक्कम मिळाली
रोहित शर्मा आयपीएलमध्ये ‘हा’ भीमपराक्रम करणारा एकमेव खेळाडू
…आणि रोहितने दोन मिनिटात केली सुनील गावसकरांची बोलती बंद
ट्रेंडिंग लेख-
गोलंदाजीचे शेर! आयपीएलच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारे ३ गोलंदाज
कोट्यवधी रुपयात विकत घेऊनही ‘या’ ५ परदेशी खेळाडूंना संघात दिली नाही संधी; एकाने गाजवलायं मागील हंगाम
मुंबईचे ५ पांडव! संघाला चॅम्पियन बनवण्यात ‘या’ पाच खेळाडूंनी निभावली मोलाची कामगिरी