क्रिकेट हा खेळ असा आहे, ज्यात अनेकदा एखाद्या संघाच्या नजरा या स्वत:च्या विजयापेक्षा जास्त इतर संघाच्या पराभवावरही असतो. असेच काहीसे आयपीएल 2023 स्पर्धेतही पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या 2 सामन्यात अशीच परिस्थिती होती. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यापैकी एक संघ प्ले-ऑफपर्यंत पोहोचू शकत होता. मुंबईने त्यांच्या अखेरच्या लीग सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत केले होते. त्यानंतर मुंबईच्या नजरा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. गुजरात टायटन्स संघात खेळल्या गेलेल्या साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यावर होत्या.
हा सामना आरसीबी संघाने जिंकला असता, तर त्यांनी चांगल्या नेट रनरेटमुळे प्ले-ऑफचे तिकीट मिळवले असते. मात्र, गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याने आरसीबी संघाच्या आशांवर पाणी फेरत शतक ठोकले. तसेच, गुजरातला विजय मिळवून दिला.
गिलने जसे 20व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारत शतक पूर्ण केले, तसे हॉटेलात बसून हा सामना पाहणारे मुंबई इंडियन्स संघाचे खेळाडू आनंदाच्या भरात उड्या मारू लागले. यादरम्यानचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ईशान किशन, कॅमरून ग्रीन यांच्यासह इतर खेळाडूही आरसीबीच्या पराभवाचा आनंद साजरा करताना दिसले.
Here's the celebrations of our Mumbai Indians boys. They depicted our reaction after today's match 💙🔥 pic.twitter.com/4tFqw4JiCG
— Mumbai Indians FC (@MIPaltanFamily) May 21, 2023
आरसीबी संघाने अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातला पराभूत केले असते, तर मुंबईइतके 16 गुण होऊनही चांगल्या नेट रनरेटच्या आधारे आरसीबी प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनला असता. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) याचे सलग दुसरे शतकही संघाच्या कामी आले नाही. तसेच, गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरातने 6 विकेट्सने सामना खिशात घातला. गुजरात साखळी फेरी संपल्यानंतर 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला. मुंबईने अखेरच्या सामन्यात हैदराबादला पराभूत केले होते. मुंबईकडून कॅमरून ग्रीन यानेही शतक साजरे केले होते.
एलिमिनेटर सामना
आता आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील एलिमिनेटर सामना लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) संघात 24 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. त्यापूर्वी 23 मे रोजी याच मैदानावर पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला जाईल. (mumbai indians players rejoice after shubman shubman gill six scripts rcb exit from ipl 2023 see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलपूर्वीच विराटबाबत धक्कादायक ब्रेकिंग! गुडघ्याच्या दुखापतीवर आरसीबीचा कोच म्हणाला…
मोठ्या मनाचा कोहली! जबरदस्त शतकानंतर गिलला मारली मिठी, दु:ख विसरून मनापासून केलं कौतुक