---Advertisement---

मोठी बातमी – मुबंई इंडियन्सला धक्का! लसिथ मलिंगा आयपीएलच्या १३ व्या हंगामातून बाहेर

On: बुधवार, सप्टेंबर 2, 2020 6:27 PM
---Advertisement---

आयपीएलचा १३ वा हंगाम यावेळी युएईमध्ये होणार असून या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. पण त्याआधीच आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सला धक्का बसला आहे. त्यांचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा या हंगामातून बाहेर पडला आहे. याबाबत मुंबई इंडियन्सने माहिती दिली आहे.

मुंबई इंडियन्सने सांगितले आहे की मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे आणि श्रीलंकेत त्याच्या कुटुंबासमवेत रहाण्यासाठी त्याची या हंगामातील अनुपलब्धता कळवली आहे.

मलिंगा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने १२२ सामन्यात सर्वाधिक १७० विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सने त्याच्या ऐवजी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला संघात स्थान दिले आहे. पॅटिन्सन येत्या आठवड्याच्या शेवटी अबुधाबीमध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील होईल.

याबरोबरच मुंबई संघाचा मालक आकाश अंबानीने पॅटिन्सनचे स्वागत केले आहे. तसेच त्यानी मलिंगाच्या निर्णयाचा सन्मान करतो असेही सांगितले आहे.

पॅटिन्सनने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही, त्यामुळे त्याला जर मुंबई इंडियन्सकडून अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली तर तो आयपीएलमध्ये पदार्पण करेल.

महत्त्वाच्या बातम्या –

‘तुम्ही इथे मजा मस्ती करायला नाही, आयपीएल खेळायला आलाय,’ विराट कोहली संतापला

‘सुरेश रैनासाठी पैसा महत्त्वाचा नाही’, दिग्गजाची सीएसकेच्या संघमालकावर कडाडून टीका

रैनाच्या गैरहजरीत गंभीरचा धोनीला सल्ला, म्हणतोय आता तू…

ट्रेंडिंग लेख –

काय तर, बेल्स हरवल्यामुळे सामना सुरु झाला नाही!

आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल

बड्डे बाॅय इशांत: ट्रोल तर कराच पण कौतूकाची थापही जरूर द्या!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---