भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग 2020 चा किताब पटकावला. मुंबईने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला. आयपीएल कारकिर्दीतील हा मुंबईचा 5 वा किताब होता.या सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार समारोहात चॅम्पियन मुंबईला मोठी रक्कम मिळाली.
या हंगामात अनेक खेळाडूंनीही आपली छाप सोडली. या स्पर्धेअखेर त्यांनाही पुरस्काराच्या रुपात मोठी रक्कम मिळाली. या लेखात आपण कोणत्या संघाला आणि कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळाली ते पाहाणार आहोत.
अंतिम सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे मुंबईला 20 कोटींची मोठी रक्कम मिळाली. त्याचवेळी उपविजेत्या दिल्लीला 12.5 कोटी रुपये मिळाले. तसेच प्लेऑफ गाठणारे दोन्ही संघ सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला प्रत्येकी 8.75 कोटी रुपये मिळाले.
• मुंबई इंडियन्स – 20 कोटी
• उपविजेता दिल्ली कॅपिटल्स – 12.5 कोटी
• पराभूत क्वालिफायर सनरायझर्स हैदराबाद – 8.75 कोटी
• पराभूत क्वालिफायर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- 8.75 कोटी
• पर्पल कॅप – कागिसो रबाडा – 10 लाख
• ऑरेंज कॅप – केएल राहुल – 10 लाख
• उदयोन्मुख खेळाडू- देवदत्त पडिककल- 10 लाख
• मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर – जोफ्रा आर्चर – 10 लाख
• गेम चेंजर ऑफ सीजन – केएल राहुल – 10 लाख
• सुपरस्ट्राइकर ऑफ द सीजन – कायरन पोलार्ड – 10 लाख
• सर्वाधिक षटकार – इशान किशन – 10 लाख
• पॉवरप्लेअर ऑफ द सीजन – ट्रेंट बोल्ट – 10 लाख
असा झाला अंतिम सामना –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 156 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईने हे लक्ष्य 18.4 षटकांत पाच गडी गमावून गाठले. मुंबईकडून रोहित शर्माने 51 चेंडूत सर्वाधिक 68 धावा केल्या. त्याने या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
महत्त्वाच्या बातम्या –
…आणि रोहितने दोन मिनिटात केली सुनील गावसकरांची बोलती बंद