नवी दिल्ली। सोशल मीडियावर बनावट फॉलोअर्सच्या बाबतीत पोलिस आपली पकड घट्ट करीत आहेत. या प्रकरणात मोठ- मोठ्या व्यक्तींची विचारपूस केली जात आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बनावट फॉलोअर्स प्रकरणी मुंबई पोलिस क्रिकेट समालोचक गौरव कपूर आणि आरजे रोशन अब्बास यांची चौकशी करणार आहेत.
एएनआयच्या मते, क्रिकेट समालोचक गौरव कपूर (Gaurav Kapur) आणि आरजे (Radio Jockey) रोशन अब्बास (Roshan Abbas) यांना मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) विशेष तपास पथकाने समन्स बजावले आहे. या प्रकरणात सुमारे १०० सेलिब्रिटी पोलिसांच्या रडारवर आहेत. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी २२ पेक्षा अधिक सेलिब्रिटींचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
खरंतर काही दिवसांपूर्वी गायिका भूमी त्रिवेदीने पोलिसांत तक्रार केली होती की काही लोक तिचे नाव घेऊन सोशल मीडियावर लोकांना बनावट फॅन फॉलोविंग देण्याचा दावा करत आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांसमोर एक मोठे रॅकेट उघडकीस आले होते, त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
३९ वर्षीय गौरव क्रिकेट समालोचका व्यतिरिक्त अभिनेताही आहे. २००३ मध्ये त्याने डरना मना है या हॉरर चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. त्याच वर्षी त्याने Ssssshhhh नावाचा आणखी एक हॉरर चित्रपट केला. तो राम गोपाल वर्माच्या आग या चित्रपटातही दिसला आहे.
२०११ ते २०१७ या काळात त्याने आयपीएल एक्स्ट्रा इनिंग्ज हा कार्यक्रम होस्ट केला होता. मार्च २०१७ मध्ये गौरवने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या वेब मालिकेची सुरुवात केली. जिथे तो क्रिकेटपटू आणि इतर खेळाडूंची मुलाखत घेतो. मायकल होल्डिंग, शोएब अख्तर, गॅरी कर्स्टन, झहीर खान, हरभजन सिंग, युवराज सिंग, आशिष नेहरा, ड्वेन ब्रावो, विराट कोहली, सौरव गांगुली, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्यासह जगातील अनेक दिग्गज खेळाडूंनी यामध्ये भाग घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-बीसीसीआयने कसली कंबर, आयपीएल २०२० बाबत घेतले ‘हे’ मोठे ५ निर्णय
-भारताचा हा ‘दिग्गज’ म्हणतो, स्टुअर्ट ब्रॉडच्या पायांमध्ये आहे स्प्रिंग
-हार्दिक पंड्या झाला बाबा; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली गुडन्यूज
ट्रेंडिंग लेख-
-वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अँडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ संघ, अव्वल स्थानी धोनीची सीएसके नव्हे तर…