---Advertisement---

Breaking: राफेल नदालने गॉफिनविरुद्धच्या पराभवानंतर लगेच घेतली एटीपी फायनल्समधून माघार

---Advertisement---

लंडन । स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने डेविड गॉफिनविरुद्ध पराभूत झाल्यानंतर लगेच एटीपी फायनल्स स्पर्धेतून माघार घेतली आहे. नदालने ही माघार गुडघा दुखीमुळे घेतली आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नदालला गॉफिनने ७-६(७-५), ६-७(४-७), ६-४ असे पराभूत केले. नदालचा साखळी फेरीतील हा पहिलाच सामना होता.

टेनिस विश्वात अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी ही स्पर्धा नदाल आजपर्यत कधीही जिंकला नाही. यावेळी ह्या खेळाडूला ही स्पर्धा जिंकायची मोठी संधी होती. नदालने १३ वर्षांत ६व्यांदा या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

आता नदालच्या जागी त्याचा देशबांधव पाब्लो कॅरिनो बूस्ट या स्पर्धेत खेळेल.

नदालने या स्पर्धेत जेव्हा भाग घेतला होता तेव्हाच तो दुखापतग्रस्त असल्याची आणि त्यातून सावरला नसल्याच बोललं जात होत. त्याने याच स्पर्धेपूर्वी पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून दुखापतीमुळे अर्ध्यातून माघार घेतली होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment