आजच्या दिवसाची शेवटची लढत परभणी पांचाला प्राईड व नांदेड चांबल चॅलेंजर्स यांच्यात झाली. दोन्ही संघांनी सावध सुरवात केली. पहिल्या 10 मिनिटात 7-7 असा बरोबरीत सामना सुरू होता त्यानंतर मात्र अजित चव्हाण व अक्षय सूर्यवंशी यांच्या आक्रमक खेळांमुळे नांदेड संघाने आघाडी मिळवली.
नांदेड संघाने मध्यंतरा नंतर 20-9 अश्या आघाडीने सुरुवात केली. अजित चव्हाण, अक्षय सूर्यवंशी यांनी चतुरस्त्र चढाया करत आपल्या संघाची आघाडी कायम ठेवली. पकडीत ऋषिकेश भोजने व प्रणय चांदेरे यांनी उत्कृष्ट खेळ केला. 37-27 असा नांदेड संघाने विजय मिळवत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
नांदेड कडून अजित चव्हाण ने चढाईत 11 गुण तर अक्षय सूर्यवंशी ने 9 गुण मिळवत महत्वाची भूमिका निभावली. नांदेडच्या ऋषिकेश भोजने व प्रणय चांदेरे यांनी प्रत्येकी 3 पकडी केल्या. परभणी कडून राहुल घांडगे ने अष्टपैलू खेळ केला तर प्रसाद रुद्राक्ष ने चढाई मध्ये उत्कृष्ट खेळ केला मात्र संघाला विजय मिळवून देता आला नाही. (Nanded Chambal Challengers team’s third win in a row)
बेस्ट रेडर- अजित चव्हाण, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर्स- राहुल घांडगे, परभणी पांचाला प्राईड
कबड्डी का कमाल- अक्षय सूर्यवंशी, नांदेड चांबल चॅलेंजर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रत्नागिरी अरावली ॲरोजचा तिसरा विजय
ठाणे हम्पी हिरोज पुन्हा अव्वल स्थानी