क्रिडाजगतात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत क्रिडापटूंमध्ये केला जातो. हे खेळाडू वर्षाला कोट्यावधी रुपये कमवतात. यामध्ये लिओनल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, विराट कोहली, जो रूट अशा खेळाडूंचा समावेश होतो. सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता आणखी एका खेळाडूचे नाव जोडले गेले आहे. पण लक्षवेधी बाब म्हणजे, या यादीत नव्याने समाविष्ट होणारा खेळाडू पुरुष नसून महिला आहे.
जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाका हिने कमाई करण्याच्या बाबतीत नवीन किर्तीमान केला आहे. ती इतिहासातील सर्वात जास्त कमाई करणारी महिला ॲथेलिट ठरली आहे. नाओमी ओसाकाने गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत एकूण ५० हजार डॉलर्स म्हणजे जवळपास ४०२ कोटींची कमाई केली आहे.
हे सर्व फक्त तिच्या मेहनतीमुळे साध्य झाले आहे. तिचा खेळ पाहून अनेक कंपन्या तिच्याकडे आकर्षित होऊ लागल्या आहेत. तिच्या कारकिर्दीत तिने आतापर्यंत एकूण ४ ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले आहेत. तसेच २०१८ मध्ये तिने दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सला पराभूत करत युएस ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
अवघ्या १२ महिन्यात केली ४०२ कोटींची कमाई
नाओमी ओसाका वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी अब्जावधींची मालकीण झाली आहे. तिचा खेळ पाहून अनेक बड्या कंपन्या तिच्याकडे आकर्षित होत आहेत. यामुळे तिने गेल्या १२ महिन्यात ५५.२ मिलियन अमेरिकी डॉलरची (४०२ करोड रुपये) कमाई केली आहे. असा कारनामा करणारी नाओमी ओसाका पहिलीच महिला ॲथलिट ठरली आहे.
टॉप-१५ मध्ये केला प्रवेश
नाओमी ओसाका सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १५ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिने ५.२ मिलियन डॉलर हे खेळातून मिळवले आहेत. उर्वरित रक्कम तिला मोठमोठ्या कंपन्यांसोबत करार करून मिळाली आहे. अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांपासून ते घड्याळ बनवणाऱ्या आणि नाईकी कंपनीने देखील तिच्यासोबत करार केला आहे.
ऑस्ट्रेलियन आणि अमोरिकन ओपन विजेती राहिलीय नाओमी
तसेच तीने दोन वेळा ऑस्ट्रेलियन व दोन वेळा अमेरिकन ओपन जिंकली आहे. फ्रेंच ओपन व विंब्लडनमध्ये ती कधीही तिसऱ्या फेरीच्या पुढे जावू शकली नाही. नाओमीचे वय आता केवळ २३ वर्ष आहे व तिच्यापुढे मोठी कारकिर्द आहे. त्यामुळे ती येत्या काळात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये नक्कीच टॉप-१० मध्ये येण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी खेळण्यास सज्ज होतो, परंतु व्यवस्थापनाला दुसरा खेळाडू माझ्यापेक्षा श्रेष्ठ वाटला’
पीएसएलच्या उर्वरित हंगामाचा मार्ग मोकळा, मुंबईहून चार्टर्ड विमान प्रवासाला युएई सरकारचा हिरवा कंदील
भारीच ना! डेविड वॉर्नरची पत्नी ऑलिम्पिक दर्शकांना आपल्या वाणीतून करणार मंत्रमुग्ध