Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतात येऊन भारतालाच नडणारा लायन! कुणालाही न जमलेली कामगिरी दाखवली करून

भारतात येऊन भारतालाच नडणारा लायन! कुणालाही न जमलेली कामगिरी दाखवली करून

March 2, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Nathan Lyon

Photo Courtesy: Twitter/ICC


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होलकर स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दारून पराभव केला, पण तिसऱ्या सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड दिसत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा दुसरा डाव सुरू झाला आणि संपला देखील. नाथन लायन याने 8 विकेट्स घेत मोठा विक्रम नावावर केला.

भारतात भारताविरुद्ध कसोटी सामना खेळताना नेथन लायन (Nathan Lyon) याने एका डावात 8 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ आहे. गुरुवारी (2 मार्च) भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो केवळ एकमेव बनला आहे. यापूर्वी एजाज पटेल, लान्स क्लुसेनर, जेसन क्रेझा, सिकंदर बख्त यांनी भारतीय संघाविरुद्ध भारतीत खेळलेल्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सचा हॉल नावावर केला होता. पण या चारही गोलंदाजांनी कारकिर्दीत प्रत्येक एक-एक वेळा ही कामगिरी केली आहे. नेथन लायनने मात्र दुसऱ्यांदा अशी कामगिरी करून स्वतःचे नाव इतिहासात कोरले.

भारतात भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सचा हॉल घेणारे गोलंदाज
2 वेळा: नॅथन लिऑन*
1 वेळ: एजाज पटेल
1 वेळ: लान्स क्लुसेनर
1 वेळ: जेसन क्रेझा
1 वेळ: सिकंदर बख्त

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) गोलंदाजांनी एकूण 16 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाचा पहिला डाव सामन्याच्या पहिल्याच दिवशी (बुधवार, 1 मार्च) संपला. पहिल्या डावात भारताने 109 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 बाद 156 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 186 धावांवर डावातील पाचवी विकेट गमावली. ऑस्ट्रेलिया या डावात समाधानकारक धावसंख्या करेल, असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन करत खेळ पालटला. पुढच्या 11 धावा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने राहिलेल्या पाच विकेट्स देखील गमावल्या आणि संघ 197 धावांवर सर्वबाद झाला.

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रलियाने या सामन्यात 88 धावांची आघाडी मिळवल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या. पण फलंदाजांच्या सुमार खेळीमुळे चाहत्यांची पुन्हा निराशा झाली. दुसऱ्या डावात भारतासाठी एकटा चेतेश्वर पुजारा अर्धशतक (59) करू शकला. रोहित शर्मा, विराट कोहली, आणि शुबमन गिल या महत्वाच्या फलंदाजांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. भारताचा दुसरा डाव अवघ्या 163 धावांवर गुंडाळला गेला. दुसऱ्या डावात संघ सर्वबाद झाल्यानंतर भारत अवघ्या 75 धावांच्या आघाडीवर आहे. असात ऑस्ट्रेलियन संघाचा विजय सध्या तरी सोपाच दिसत आहे. (Nathan Lyon became the only bowler to get 8-wicket haul against India in India in Tests)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा रंगणार गंभीर-आफ्रिदीचे महायुद्ध! लिजेंड्स लीगमध्ये कर्णधार म्हणून समोरासमोर उभे ठाकणार
काट्याच्या इंदोर कसोटीपेक्षा पॉंटिंगला सतावतेय दुसरीच चिंता, म्हणाला, “आता त्याचं कसं होणार?”


Next Post
Nathan-Lyon

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा 'सम्राट' बनला लायन! दोन भारतीयांना पछाडत कमावले सर्वोच्च स्थान

Nathan-Lyon-Record

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारे 4 खेळाडू; तीन भारतीय सोडले, तर लायन एकमेव ऑस्ट्रेलियन

Cheteshwar Pujara

नेहमीप्रमाणे पुजारा यावेळीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहिला 'टॉप स्कोरर', भारताला मिळवून दिली आघाडी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143