बिहार राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पटणा- बिहार येथे सुरू असलेल्या किशोर राष्ट्रीय स्पर्धेचा आज दुसरा दिवस. आज महाराष्ट्राच्या मुलांनी उत्तरांचलला ६२-३४असे एकतर्फी पराभव करीत बाद फेरीतील आपले स्थान निश्र्चित केले.
महाराष्ट्राचा साखळीतील शेवटचा सामना राजस्थानशी होईल. महाराष्ट्राने आज सुरुवात थोडी संथ केल्यामुळे पहिल्या डावात २८-१८अशी आघाडी महाराष्ट्राकडे होती. दुसऱ्या डावात मात्र त्यांनी धडाकेबाज खेळ करीत २८गुणांनी सामना सहज आपल्या नावे केला. पियुष पाटील, राहुल वाघमारे, दीपक केवट यांना या मोठ्या विजयाचे श्रेय जाते.
महाराष्ट्राच्या मुलींनी देखील आज ग गटात उत्तरांचलला ५६-१६असे सहज धुवून काढले. मध्यांतराला ३२-०९ अशी मोठी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळ करीत ४०गुणांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.
समीक्षा कोल्हे, रष्मी पाटील, ऋजाता लभडे यांच्या आक्रमक चढाया त्याला प्रशिता पन्हाळकर, आकांक्षा बने, मयुरी वेखंडे यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हा विजय सहज मिळविता आला. महाराष्ट्राचा शेवटचा साखळी सामना तामिळनाडूशी होईल. या विजयाने महाराष्ट्राच्या मुलींनी बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–स्टार रेडर सिद्धार्थ देसाई नक्की खेळणार तरी कोणत्या संघाकडून?
–राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर, महाराष्ट्राचे दोन्हीं संघ ग गटात
–राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांची विजयी सलामी
–ठाण्यातील काल्हेर येथे होणाऱ्या सरपंच चषक कबड्डी स्पर्धेबद्दल सर्वकाही
–विश्वनाथ स्पोर्ट मीट कबड्डी स्पर्धेत गरवारे महाविद्यालयाचा शानदार विजय
–आयसीसी पुरस्कारात बाजी मारणाऱ्या किंग कोहलीने केले हे खास ५ विक्रम
–या ४ भारतीय क्रिकेटपटूंना २००४पासून मिळाले आहेत सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचे पुरस्कार
–२१वर्षीय रिषभ पंत ठरला आयसीसीचा ‘उद्योन्मुख खेळाडू’