युवा फलंदाज सरफराज खान याने गुरुवारी (15 फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटीतून पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच सामन्यात सरफराजने गुरुवारी अर्धशतक देखील ठोकले. सरफराजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा प्रवास चांगलाच महेनतीचा राहिला. यादरम्यान त्याचा सर्वात जास्त पाठबळ कुणाचे मिळाले, तर ते त्याचे वडील नौशाद खान होते. नौशाद खान गुरुवारी सरफराजच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी उपस्थित राहणार नव्हते. केवळ सूर्यकुमार यादव याच्या एका मेसेजमुळे नौशाद राजकोटसाठी रवाना झाले.
मागच्या काही रणजी हंगामांमध्ये सरफराज खान (Sarfaraz Khan) याने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. यादरम्यान त्याने अनेक शतके ठोकली. कारकिर्दीतील 45 प्रथण श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 69.85च्या सरासरीने धावा केल्या आहेत. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी त्याला दीर्घकाळ वाट पाहावी लागली. पण गुरुवारी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संघ व्यवस्थापनाकडून अखेर सरफराजला पदार्पणीच संधी देण्याचा निर्णय घेतला गेला. राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात सरफराजने 66 चेंडूत 62 धावांची खेळी केली. रविंद्र जडेजा याच्याशी ताळमेळ बिघडल्यामुळे तो नॉन स्ट्राईक एंडवर धावबाद झाला.
सरफराजच्या कसोटी पदार्पणावेळी वडील नौशाद आणि त्याची पत्नी राजकोटमध्ये आले होते. पण नौशाद यांना इथपर्यंत आणण्यामध्ये सध्या संघातून बाहेर असेलल्या सूर्यकुमार यादव याचे योगदान महत्वाचे राहिले. ते म्हणाले की, “सुरुवातील इथे येणार नव्हतो. कारण यामुले सरफराजवर दबाव आला असता आणि दुसरे म्हणजे मला ताप आला होता. पण सूर्यकुमारच्या मेसेजमुळे माझे मन बदलले.”
नौशाद खान यांना भारताचा स्टार टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचा मेसेज आला की, “मी तुमच्या भावना समजू शकतो. पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी जेव्हा माझे कसोटी पदार्पण केले, तेव्हा माझे आई-वडील माज्या मागे उभे होते. तो क्षण माझ्यासाठी खास पेक्षा जास्त काहीतरी होता. असे क्षण नेहमी येत नाहीत. त्यामुळे मी सांगेल की, तुम्ही गेले पाहिजे.” सूर्यकुमारच्या या मेसेजनंतरच नौशाद यांनी राजकोटला जाण्याचा निर्णय घेतला.
ते पुढे म्हणाले, “सूर्यकुमारच्या या मेसेजनंतर मी स्वतःला इथे येण्यापासून रोखू शकलो नाही. मी एक गोळी (औषध) खाल्ली आणि राजकोटमध्ये पोहोचलो.” दरम्यान, राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवशी नौशाद आणि रोहित शर्मा यांच्यातील चर्चा देखील समोर आली. नौशाद रोहितचा सर म्हणून उल्लेख करत मुलाची काळजी घ्या, असे म्हणतात. त्यावर रोहितने देखील मन जिंकणारे उत्तर दिले. (Naushad Khan was present for his son Sarfaraz’s Test debut because of Suryakumar Yadav’s message)
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
महत्वाच्या बातम्या –
NZ vs SA : दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने केला पराभव, संपला 92 वर्षांचा दुष्काळ
IND Vs ENG : रवींद्र जडेजाची कामगिरी पाहून रवी शास्त्री यांना झाली डॉन ब्रॅडमनची आठवण, म्हणाले…