मुंबई । आपल्या धारदार गोलंदाजीने विरोधी संघास घाम फोडणारा भारतीय वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने सोशल मीडियावर व्यायाम करतानाचा फोटो शेअर केले आहे. त्याच्या या फोटोवर क्रिकेट फॅन्सने कमेंट्सचा पाऊस पाडला.
नव्या दमाच्या सैनीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘मी माझ्या कामास खूप गांभीर्याने घेत आहे.’ सैनीने सोशल मीडियावर सिक्स पॅक्सचा फोटो शेअर केला आहे. वर्क आऊट झाल्यानंतर तो आपल्या चाहत्यांना त्याची बॉडी दाखवत आहे. त्यानंतर फॅन्सने त्याच्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नशीबाने सैनीचे वडील शेतकरी असल्याने व त्याचे शेत मोठे असल्याने त्याला सरावाला जागा मिळाली. त्याने यावेळी शेतात काम करताना तेथेच व्यायामही केला. तो हरियाणातील एका स्थानिक क्लबमध्ये सराव देखील करत होता.
If it would have been easy, I would not be on this path. pic.twitter.com/xSLsvMwfNY
— Navdeep Saini (@navdeepsaini96) June 7, 2020
सैनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराटच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो. त्याने 13 आयपीएल सामन्यात 26.2 च्या सरासरीने 11 बळी घेतले आहेत. यावर्षी आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आयसीसी टी 20 विश्वचषकात स्थान मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण कोरोना विषाणूमुळे आयपीएल 2020 अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली होती.