इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. याच स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा ऑक्शन पार पडले. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडू कोट्यवधी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर अनुभवी खेळाडूंना खाली हात परतावे लागले आहे. तसेच असे काही भारतीय गोलंदाज होते ज्यांनी कोट्यावधींची कमाई केली. त्यापैकीच एक गोलंदाज म्हणजे नवदीप सैनी.
गतवर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या नवदीप सैनीला आगामी हंगामासाठी रिलीज करण्यात आले होते. आता आगामी हंगामात तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाने त्याला २ कोटी ६० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये होती.
आयपीएल मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी (१३ फेब्रुवारी ) ही राजस्थान रॉयल्स संघाकडून पहिलीच यशस्वी बोली होती. तसेच नवदीप सैनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत एकूण २८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला १७ गडी बाद करण्यात यश आले आहे. आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
खलील अहमदसाठी उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सने ओतला पैसा, पाहा किती रुपयांना केले खरेदी?
अनुभवी ऑलराऊंडर्स अनसोल्ड तर नवख्या खेळाडूंनी केली कोट्यावधींची कमाई! पाहा संपूर्ण यादी