भारतीय संघाचा ‘नॅच्युरल यष्टिरक्षक’ म्हणून ओळखला जाणारा नयन मोंगिया ( nayan mongia) आपला ५२ वा वाढदिवस साजरा करतोय. त्याचा जन्म १९ डिसेंबर १९६९ रोजी गुजरातच्या बडोदामध्ये झाला होता. यष्टीच्या मागे जलवा दाखवणाऱ्या या यष्टिरक्षकाने एकूण १०७ शिकार केले होते. परंतु मैदानाबाहेर तो अनेकदा विवादात देखील अडकला होता.(Nayan mongiya birthday special ,see his records and stats)
नयन मोंगियाने १९९४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याला लखनऊच्या मैदानावर श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याला आपल्या कारकीर्दीत एकूण ४४ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने यष्टीमागून १०७ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
तो मैदानावर असताना नेहमी उत्साहाने परिपूर्ण असायचा. नेहमी संघाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असायचा. दरम्यान एका सामन्यात त्याने संघाचा उत्साह वाढवण्यासाठी पंचांकडे अपील केली आणि त्यानंतर पंचांनी दिलेल्या निर्णयाचा विरोध देखील केला. ज्यामुळे पंचांनी त्याच्यावर दंड ठोठावला होता. त्यानंतर त्याला निलंबित देखील करण्यात आले होते. तर दुसरीकडे १९९० मध्ये त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. अद्यापही हे आरोप सिद्ध झाले नाहीत. नयन मोंगियाने डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. ही जबाबदारी स्वीकारत त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध १९९६ मध्ये झालेल्या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती.
नयन मोंगियाचा गाजलेला किस्सा म्हणजे, पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने बोट तुटलेले असताना देखील यष्टिरक्षण केले होते. त्याच्या प्रथमश्रेणी क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १५८ सामन्यात ७७३६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १२ शतक आणि ४५ अर्धशतक झळकावले होते. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्ध झालेला सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. या सामन्यात त्याने १४ चेंडू खेळत अवघ्या ४ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला कधीच वनडे संघात स्थान मिळाले नाही.
महत्वाच्या बातम्या :
भारतीय क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाण्या दिवसाची वर्षपूर्ती! अवघ्या ३६ धावांवर विराटसेना झालेली ढेर
गांगुली म्हणतोय, “… विराट आजकल खूप भांडतोय”
भारतीय क्रिकेटचे भविष्य सांभाळणार लखनऊ-अहमदबादचे नेतृत्व? मिळालीये तब्बल ‘इतक्या’ कोटींची ऑफर