जवळपास अडीच वर्षांच्या दीर्घ काळानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याला सूर गवसला आहे. तो सध्या भलताच फॉर्मात आहे. विराटने 2019 पासून शतक ठोकले नव्हते, पण त्याने आशिया चषक 2022मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतकही साजरे केले. याव्यतिरिक्त आता तो टी20 विश्वचषक 2022मध्येही सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. इतकेच नाही, तर काही महिन्यांपूर्वी विराटला पाठिंबा देणारा इंग्लंडचा दिग्गज माजी कर्णधार केविन पीटरसन याने यू-टर्न घेतला आहे. विराटच्या बॅटमधून धावा निघताना त्याला बघवत नाहीये. काही काळापूर्वी विराटने फॉर्ममध्ये परतावे असे त्याला वाटायचे, पण आता तो म्हणतोय की, विराटचा उपांत्य सामना खराब जावा.
खरं तर, टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) भारत विरुद्ध इंग्लंड संघात खेळला जाणार आहे. ऍडलेड मैदानावर रंगणारा हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. यामुळे केविन पीटरसन (Kevin Pietersen) याला वाटते की, विराटने धावा करू नयेत. कारण, त्याने धावा केल्या, तर इंग्लंड संघाच्या चिंता वाढतील. विराटच्या वाईट काळात पाठिंबा देणारा पीटरसन म्हणतो की, विराटचा फक्त एकच दिवस खराब गेला पाहिजे आणि तो दिवस गुरुवार आहे.
काय म्हणाला पीटरसन?
केविन पीटरसन याने एका वृत्तवाहिनीसाठी लिहिलेल्या आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले की, “विराट जेव्हा फॉर्मात नव्हता, तेव्हा मी त्याला पाठिंबा दिला होता. त्याच्याकडे खूप काही होते. तो मनोरंजन करणारा एक चांगला व्यक्ती आहे. त्याला गर्दीची आवश्यकता आहे, त्याला उत्साहाची गरज आहे, त्याला त्या उत्साहाची गरज आहे. काही वर्षांपर्यंत त्याच्याकडे ते नव्हते. तसेच, तो आपला रस्ता भटकला होता, परंतु आता मैदानात गर्दी आहे, हा ऑस्ट्रेलियातील टी20 विश्वचषक आहे. टी20 क्रिकेट खेळण्यासाठी सर्वात महान ठिकाणांपैकी एक आहे आणि विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. एक जवळचा मित्र म्हणून मी त्याच्यासाठी खूप खुश आहे, पण फक्त विराटने एक दिवस न खेळता राहिले पाहिजे.”
विराटची टी20 विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी
विराट कोहली याच्या टी20 विश्वचषकातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात 123च्या सरासरीने 246 धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने 3 अर्धशतकेही झळकावली आहेत. यादरम्यान नाबाद 82 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
आता विराट इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात काय कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Need him to have a day off in semis says kevin pietersen on former skipper Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘असं’ झालं, तर भारत- न्यूझीलंड संघात रंगणार टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना, आयसीसीचा नियम घ्या जाणून
विराटची फिटनेस भारीच, पण दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचने पुढच्या सहा वर्षांसाठी दिला ‘हा’ खास सल्ला