टोकियो ऑलिंपिकमध्ये इतिहास रचल्यानंतर आता भारताचा स्टार भालाफेकपटू नीपज चोप्रा याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ज्यूरिख येथे झालेल्या डायमंड लीगच्या अंतिम सामन्यात विजेतेपद मिळवण्याची कामगिरी त्याने केली आहे. 2010 मध्ये सुरू झालेल्या डायमंड लीगच्या 13 व्या हंगामात जेतेपद मिळवणारा नीरज पहिलाच भारतीय ऍथलीट बनला आहे.
डायमंड लीगच्या अंतिम सामन्यात नीरजची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्याचा पहिलाच थ्रो फाउल ठरला होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याने 88.44 मीटर अंतावर भाला फेकत आघाडी घेतली. हा त्याचा सर्वोत्कृष्ट थ्रो फेकला. तिसऱ्या फेरीत 88.00 मीटर, चौथ्या फेरीत 86.11 मीटर, पाचव्या फेरीत 87.00 मीटर आणि सहाव्या फेरीत 83.60 मीटर दूर थ्रो त्याने फेकले. अखेर दुसऱ्या फेरीतील थ्रोच्या जोरावर तो विजेता बनला.
Golds,Silvers done, he gifts a 24-carat Diamond 💎 this time to the nation 🇮🇳🤩
Ladies & Gentlemen, salute the great #NeerajChopra for winning #DiamondLeague finals at #ZurichDL with 88.44m throw.
FIRST INDIAN🇮🇳 AGAIN🫵🏻#indianathletics 🔝
X-*88.44*💎-86.11-87.00-6T😀 pic.twitter.com/k96w2H3An3
— Athletics Federation of India (@afiindia) September 8, 2022
डायमंड लीगला ऑलिंपिक आणि जागतिक चँपियनशीनंतर ट्रॅक अँड फिल्डमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा मानले जाते. या स्पर्धेत विजेता बनल्यानंतर नीरजला हिरे जडलेली डायमंड ट्रॉफी आणि 30 हजार अमेरिकी डॉलरने सन्मानित करण्यात आले. तसेच 2023 मध्ये हंगेरच्या बुडापेस्टमध्ये होणाऱ्या जागतिक ऍथलेटिक्स चँपियनशीपसाठीही वाइल्ड कार्ड प्रवेश मिळाला आहे.