भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा शनिवारी (७ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहे. पुरुषांच्या भालाफेक प्रकारात त्याने पदक जिंकले तर, ऑलिम्पिक ऍथलेटीक्समध्ये भारताला पदक मिळण्याची ही १०० वर्षांतील पहिलीच वेळ असेल. त्याच वेळी नीरजचा सराव करतानाचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो चांगलाच घाम गाळताना दिसतोय.
नीरज असा होतोय अंतिम सामन्यासाठी तयार
शनिवारी होणाऱ्या भालाफेक अंतिम सामन्यासाठी तयारी करतानाचा नीरजचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तो सराव करताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने तो अडथळ्यांच्या शर्यतीसाठी वापरले जाणारे अडथळे पार करत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने ‘आजचा मोठा दिवस आहे… जय हिंद’
नीरज हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा अखेरचा खेळाडू आहे.
https://twitter.com/NeerajChopra_/status/1423916282940850182
अंतिम सामन्यात असणार पाकिस्तानचे आव्हान
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पारंपारिक लढत यावेळी ऑलिम्पिकच्या भालाफेक मैदानात दिसेल. चार ऑगस्ट रोजी झालेल्या पात्रता फेरीत तो दोन्ही गटांमध्ये अव्वल राहिला होता. त्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली होती. दुसरीकडे, पाकिस्तानचा अर्शद नदीम ब गटामध्ये अव्वल राहिला. त्यामुळे अंतिम फेरीत या दोघांमध्ये चुरस पाहायला मिळेल.
नीरज आणि अर्शद एकमेकांसमोर येण्याची ही पहिली वेळ नाही. २०१८ च्या आशियाई खेळांमध्ये नीरज आणि अर्शद पदके मिळवण्यात यशस्वी झाले होते. या स्पर्धेत नीरजने सुवर्ण काबीज केले, तर अर्शदला कांस्यपदक मिळालेले. तर,रौप्य पदक चीनच्या लुई कुझेनने आपल्या नावे केले होते. त्यामुळे या अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंवर विशेष नजर राहील.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑसी गोलंदाजाने टी२० पदार्पणातच केला हॅट्रिकचा कारनामा, तरीही संघ बांगलादेशविरुद्ध पराभूत
रेकॉर्ड अलर्ट! शमी आणि बुमराहकडे आज तीन भारतीय दिग्गजांना मागे टाकण्याची संधी
बुमराहच्या षटकाराने सर्वांनाच घातली भुरळ, सचिनही झालाय प्रभावित; तुम्ही तो सिक्स पाहिलाय ना?