कोणत्याही क्रिडापटूला प्रकाशझोतात आणण्यासाठी त्याची एक विलक्षण कामगिरीच पुरेशी असते. एकदा त्याने असाध्य असे यश प्राप्त केले तर, आयुष्यभर आणि त्यानंतरही त्याची आठवण काढली जाते. २ वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये टोकियो येथे प्रतिष्ठित टोकियो ऑलिंपिक २०२० चा (Tokyo Olympic 2020) थरार पार पडला. या ऑलिंपिकमध्ये भारताकडून भालाफेक या खेळात नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने सुवर्णपदक पटकावत भारतीयांची मान उंचावली होती. त्यानंतर भारतभरातून त्याच्या या यशाचे कौतुक झाले होते. त्याच्या कामगिरीला जवळपास २ वर्षे उटल्यानंतरही भारताच्या टपाल विभागाने (Indian Post Office) त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याचा सन्मान केला आहे.
भारतीय टपाल विभागाने हरियाणाच्या पानीपत स्थित नीरजच्या खंडरा गावामध्ये (Neeraj Chopra’s Village)सोनेरी रंगाची टपालपेटी (Golden Post Box) लावली आहे. यावर नीरजचे नाव आणि त्याच्या कामगिरीचा थोडक्यात उल्लेख करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर या टपालपेटीचा फोटो वेगाने व्हायरल होतो आहे. बऱ्याचशा मोठ्या अधिकाऱ्यांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. यावर भारतीय टपाल विभागाने सर्वांचे आभार मानले आहेत.
So this is what caught my eye. @IndiaPostOffice commemorated Neeraj Chopra's Javelin Throw gold medal in the Tokyo Olympic Games by installing this unique Post Box in his village, perhaps less than 87.58m from his home. https://t.co/237qjbD4pE pic.twitter.com/k1plpj054A
— G Rajaraman (@g_rajaraman) January 8, 2022
हरियाणातील खंडरा गावामध्ये लावण्यात आलेल्या या सोनेरी रंगाच्या टपालपेटीवर लिहिण्यात आले आहे की, नीरज चोप्रा, टोकियो ऑलिंपिक २०२० भालाफेकमधील सुवर्णपदक विजेत्याच्या सन्मानार्थ. भारतीय टपाल विभागाने उचललेल्या या पाऊलाचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसते आहे.
व्हिडिओ पाहा-
नीरजविषयी थोडंसं
भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५vमेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.
तसेच टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भालाफेक खेळात देशाची मान उंचावली आहे. तब्बल ८७.५८ मीटर अंतरावर थ्रो फेकत त्याने सुवर्ण पदक निश्चित केले आणि देशाला टोकियो ऑलिंपिक्समधील पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. सध्या तो अमेरिकेत पॅरिस ऑलिंपिकची तयारी करतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“जग जसं पाहतं तसं मी स्वतःकडे कधीच पाहत नाही”, विराट कोहलीचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
हेही पाहा-