क्रिकेटच्या मैदानावर नेपाळी क्रिकेटपटू रोहित पौडेलने एक अप्रतिम झेल घेतला आहे. ज्याचे आयसीसीकडूनही कौतुक होत आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या सहा सामन्यांच्या तिरंगी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात नेपाळ आणि ओमानचा संघ आमनेसामने आला होता. या सामन्यात ओमानने नेपाळचा ५ गडी राखून पराभव केला असला, तरी नेपाळी क्रिकेटपटू रोहितने सीमा रेषेवर एक अद्भुत झेल घेत जबरदस्त कामगिरी केली आहे. आयसीसीने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की रोहितने ओमानचा शतकवीर फलंदाज जतिंदर सिंगचा सीमारेषेवर हवेत झेपावत झेल घेतला आहे. ओमानकडून जतिंदरने ६२ चेंडूत १०७ धावांची खेळी खेळली. ज्यात त्याने ६ षटकार आणि १२ चौकार लगावले. पण २६ व्या षटकात कुशल मल्लच्या तिसऱ्या चेंडूवर जतिंदर पुढे आला आणि त्याने लाँगवर हवेत फटका मारला, जो सीमारेषा ओलांडून षटकारासाठी जात होता, पण रोहित सीमारेषेकडे धावत आला आणि चेंडू सीमारेषा ओलांडण्याआधी त्याने हवेत उडी मारली आणि अप्रतिम झेल पकडला.
पण याचवेळी रोहित झेल घेत तोल जात असल्याने सीमारेषा ओलांडून जात होता, त्यामुळे त्याने हवेत असताना चेंडू सोडला. यानंतर, दुसऱ्या प्रयत्नात, रोहित सीमारेषेच्या बाहेर आला आणि चेंडू पडण्यापूर्वीच त्याने त्याला अलगद पकडले. अशा प्रकारे शतकवीर फलंदाज जतिंदर बाद झाला. हा व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. क्रिकेट चाहत्यांनी त्यास मोठ्या प्रमाणावर शेअर केले आहे.
Simply ridiculous from Nepal's Rohit Paudel 🤯
Watch the Men’s CWC League 2 match live on https://t.co/CPDKNxoJ9v and @FanCode (in the sub-continent) 📺 pic.twitter.com/m6ZxYIPiya
— ICC (@ICC) September 15, 2021
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नेपाळने प्रथम फलंदाजी केली आणि ४७.४ षटकांत १९६ धावा केल्या. त्यानंतर ओमानच्या संघाने ३२ व्या षटकात ५ गडी गमावून २०० धावा करून सामना सहज जिंकला. आसिफ शेखने नेपाळसाठी सर्वाधिक धावा केल्या. असिफने ९० धावांची खेळी खेळली. पण त्यास इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्याने नेपाळ मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रतिभेची कमी नाही! आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात ‘हे’ ३ अनकॅप्ड खेळाडू गाजवू शकतात युएईची मैदानं
टी२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य फेरीत धडक मारू शकणारे ४ संघ, भारताचं नाव आहे की नाही?
आयपीएल २०२१: चेन्नई संघात दुखापतग्रस्त फाफ डू प्लेसिसची जागा घेऊ शकतात ‘हे’ ३ क्रिकेटर