---Advertisement---

‘अपने साथ मत जोडीये हमको’! स्वत:ची कॅलिस-वॉटसनशी तुलना करणाऱ्या विजय शंकरची नेटकऱ्यांनी घेतली शाळा

On: सोमवार, मे 17, 2021 4:40 PM
---Advertisement---

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर मागील २ वर्षांपासून पुनरागमनाच्या प्रतिक्षेत आहे. त्याने २०१९ सालच्या विश्वचषकात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून अद्याप या ३० वर्षीय क्रिकेटपटूवर दुर्लक्ष केले जात असल्याने त्याने निराशा व्यक्त केली आहे. नुकतेच त्याने स्वत:ची तुलना क्रिकेटजगतातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंपैकी एक असणाऱ्या जॅक कॅलिस आणि शेन वॉटसन यांच्याशी केली आहे. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांला चांगलेच ट्रोल केले आहे.

त्याचे झाले असे की, शंकरने आपल्याला वरच्या फळीत फलंदाजीची संधी मिळाल्यास, आपणही कॅलिस आणि वॉटसनसारखे अष्टपैलू बनू शकत असल्याचे सांगितले आहे.

तो म्हणाला की, “मला सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले, तर मी या क्रमांकावर चांगली कामगिरी करु शकतो. मीसुद्ध जॅक कॅलिस किंवा शेन वॉटयनसारखा बनू शकतो. ते दोघेही सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर खेळले आहेत. असे काही ठरलेले नाही की, कोणताही अष्टपैलू ६ किंवा ७ क्रमांकावरच फलंदाजी करेल. जर मी वरच्या फळीत धावा करत असेल आणि विकेटही घेत असेल, तर याचा फायदा संघालाच होणार आहे.”

शंकरच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे. तो सध्या ट्विटरवर ट्रेंडमध्ये असून अनेकांनी त्याचे मीम्स व्हायरल केले आहेत.

https://twitter.com/venki_offl/status/1394174833789870081?s=20

https://twitter.com/MTvalluvan/status/1394186686515400707?s=20

https://twitter.com/KoreanJokerKim/status/1394207158569373697?s=20

https://twitter.com/AbdullahNeaz/status/1394197137760559105?s=20

शंकरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
शंकरने आत्तापर्यंत भारतीय संघाकडून १८ जानेवाीरी २०१८ ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने १२ वनडे सामने खेळले. यात त्याने २२३ धावा केल्या आणि ४ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने २०१८ सालीच मे महिन्यात श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना १०१ धावा केल्या आणि ५ विकेट्स घेतल्या.

तो भारताकडून शेवटचा सामना २०१९ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध मँचेस्टर येथे खेळला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---