न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळण्याआधी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आगामी वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये २० खेळाडूंना स्थान दिले गेले असून, यामध्ये दोन खेळाडूंचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणारा युवा यष्टीरक्षक ग्लेन फिलीप्स व अष्टपैलू डेरिल मिचेल यांनी प्रथमच मध्यवर्ती करारात स्थान मिळवले. तर, कसोटी फिरकीपटू एजाज पटेलला करारमुक्त करण्यात आले.
यांनी बनवली यादी
आगामी वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची निवड न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड व निवडकर्ते गॅविन लार्सन यांनी केली. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या खेळाडूंना यामध्ये स्थान दिले गेल्याचे म्हटले जात आहे.
ग्लेन फिलीप्सने आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून १२ सामन्यात १८५ चा स्ट्राईक रेटने ३३६ धावा केल्या होत्या. त्याचेच बक्षीस फिलीप्सला मिळाले. तर, मागील काही वर्षापासून सर्व प्रकारचे क्रिकेट खेळणाऱ्या मिचेलला न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्तीची घोषणा केलेल्या अनुभवी यष्टीरक्षक बीजे वॉटलींग याला देखील या करारात स्थान दिले गेले असून, भविष्यात त्याची जागा टॉम ब्लंडेल घेऊ शकतो.
करारबद्ध झालेले खेळाडू-
टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवॉन कॉनवे, कॉलिन डी ग्रॅंडहोम, लॉकी फर्गुसन, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, कायले जेमिसन, टॉम लॅथम, डेरिल मिचेल, हेन्री निकोल्स, जिमी निशाम, ग्लेन फिलीप्स, ईश सोढी, मिचेल सॅंटनर, टीम साऊदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, केन विलियम्सन, विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या-
मायकेल वॉनने पुन्हा ओकली गरळ, विराटबाबत केले वादग्रस्त वक्तव्य
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलेले ११ भारतीय, आज असतात तरी कुठे?






