चित्रपट, वेबसीरीज आणि मालिकांद्वारे लोकांचे मनोरंजन करत असलेल्या, ऑनलाइन स्ट्रिमिंग क्षेत्रातील अव्वल कंपनी ऍमेझॉन प्राईम व्हिडिओने क्रीडाविश्वात देखील आपले पदार्पण केले आहे. ऍमेझॉन प्राईम व्हिडिओने क्रीडाक्षेत्रात उतरण्यासाठी क्रिकेटची निवड केली. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सर्व क्रिकेट स्पर्धांचे भारतात थेट प्रक्षेपण करण्याचे हक्क ऍमेझॉन प्राईम व्हिडिओने मिळवले आहेत.
न्यूझीलंडमध्ये २०२१ च्या सुरुवातीपासून २०२५-२०१६ च्या अखेरपर्यंत अशा, सहा वर्षाच्या कालावधीत खेळवल्या जाणाऱ्या सर्व क्रिकेट मालिकांचे प्रक्षेपण ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ भारतात करेल. यामध्ये प्रामुख्याने न्यूझीलंड पुरुष संघ व न्यूझीलंड महिला संघ खेळणार असणाऱ्या तिन्ही प्रकारच्या सामन्यांचा समावेश असेल.
ऍमेझॉन प्राईम व्हिडिओचे भारतातील प्रमुख गौरव गांधी यांनी या कराराविषयी बोलताना सांगितले, “भारतात सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या क्रिकेटसोबत जोडले गेल्याने आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. न्युझीलंडसारख्या सभ्यतेने क्रिकेट खेळणाऱ्या संघाशी जोडले गेल्याने आम्ही गौरवान्वित झालो आहोत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट सामने कायमच रोमहर्षक झाले आहेत; या दोन्ही देशांतील क्रिकेटसंबंध वृद्धिंगत करण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील.”
आयसीसीच्या ‘फ्युचर टूर प्रोग्राम’ नुसार भारत २०२१ ते २०२६ यादरम्यान न्यूझीलंडमध्ये दोन मालिका खेळू शकतो. यातील पहिली मालिका २०२२ मध्ये खेळली जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
Video -“तुला ऑस्ट्रेलियातच भेटेल”, डेविड वॉर्नरचा हैदराबादच्या यॉर्कर किंगला खास संदेश
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
ट्रेंडिंग लेख –
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय