---Advertisement---

माझ्यासाठी या देशाविरुद्ध खेळणे मोठे आव्हान असेल- रोहित शर्मा

On: गुरूवार, जानेवारी 9, 2020 3:31 PM
---Advertisement---

या महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये 5 टी20 सामने, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. परंतू या दौऱ्यावर जाण्याआधी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) आपले मत व्यक्त केले आहे.

न्यूझीलंड संघाची घातकी गोलंदाजी भारताविरुद्ध त्यांच्या मायदेशात परिणामकारक ठरू शकते. कारण ते आपल्या रणनीतीवर योग्यप्रकारे काम करतात, असे रोहित म्हणाला.

“क्रिकेट खेळण्यासाठी न्यूझीलंड ही सोपी जागा नाही. यापूर्वी आम्ही कसोटी मालिका 0-1 ने गमावली होती. तेव्हा आम्ही चांगल्या प्रकारे प्रत्यूत्तर दिले होते. परंतु आता यावेळी आमच्या गोलंदाजीची रणनीती वेगळ्या प्रकारची असेल,” असे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रोहित म्हणाला.

“माझ्यासाठी हा दौरा आव्हानात्मक असेल यात काही शंका नाही. तसेच या ठिकाणी मला नव्या चेंडूचा सामना करावा लागेल,” असेही रोहित यावेळी म्हणाला.

रोहित आता कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी करतो. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये 2014 ला झालेल्या कसोटी मालिकेत रोहितने मधल्या फळीत फलंदाजी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---