Kane Williamson On Pitch: बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) न्यूझीलंडला भारतीय संघाविरुद्ध 70 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवामुळे त्यांचे अंतिम सामन्यात पोहोचण्याचे स्वप्न भंगले. हा सामना वानखेडे स्टेडिअम येथे पार पडला. मात्र, या सामन्यात वापरल्या गेलेल्या खेळपट्टीवरून बरेच आरोप झाले. तसेच, अखेरच्या क्षणी खेळपट्टी बदलण्याविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याच्या मते, वानखेडेची खेळपट्टी खूपच चांगली होती. खरं तर, या खेळपट्टीवर स्पर्धेतील काही सामने खेळले गेले आहेत.
काय म्हणाला विलियम्सन?
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याने मान्य केले की, वापर केल्यानंतरही ही खेळपट्टी खूपच शानदार होती. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना त्याने म्हटले की, “ही वापरली गेलेली खेळपट्टी असली, तरीही खेळपट्टी खूपच चांगली होती. तसेच, भारतीय खेळाडूंनी फलंदाजीवेळी याचा भरपूर फायदा उचलला. आम्हीदेखील पाहिले की, येथे सायंकाळ होता-होता स्थिती बदलली होती. मात्र, तरीही वास्तवात आम्ही चांगला खेळ खेळला.”
वानखेडे स्टेडिअममध्ये तळपली भारतीय फलंदाजांची बॅट
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने निर्धारित 50 षटकात 4 विकेट्स गमावत 397 धावांचा भलामोठा डोंगर उभारला. भारताकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने 117, श्रेयस अय्यरने 105, शुबमन गिलने 80, रोहित शर्माने 47 आणि केएल राहुलने नाबाद 39 धावा केल्या होत्या. तसेच, न्यूझीलंडच्या डावात गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने कहर केला. त्याने 9.5 षटकात 57 धावा खर्चून 7 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
The golden era is far from over in the eyes of Kane Williamson 📚
New Zealand's captain believes the Black Caps have more to give in a quest for future ICC tournament silverware 👇https://t.co/WmxIbxKCxU
— ICC (@ICC) November 15, 2023
भारताच्या 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 327 धावांवरच गुडघे टेकले. त्यांच्याकडून फक्त डॅरिल मिचेल याने 134 धावांची खेळी खेळली होती. त्याच्याव्यतिरिक्त केन विलियम्सनने 69 धावा केल्या.
स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. यांच्यापैकी जो संघ विजय मिळवेल, तो भारतासोबत अंतिम सामन्यात भिडेल. विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पार पडणार आहे. (new zealand skipper kane williamson comment pitch controversy wankhede stadium ind vs nz icc odi world cup 2023)
हेही वाचा-
Semi Final जिंंकल्यानंतर इमोशनल झाले भारतीय खेळाडू, अश्विनने हाताचे चुंबन घेताच शमी म्हणाला, ‘उत्तर देऊन…’
टीम इंडियाला मिळणार नवे कोच? वर्ल्डकप जिंकला तरी होणार द्रविड यांचे पॅकअप?