आयसीसी टी20 विश्वचषक 2024 च्या 32 व्या सामन्यात न्यूझीलंड संघाने युगांडा विरुद्ध 9 विकेट्स 88 चेंडू राखून दमदार विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना युगांडा केवळ 40 धावांवर सर्वबाद झाला, प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 5.2 षटकात सामना जिंकला . संघाचा सलामीवीर फलंदाज डेवाॅन काॅनवेने 22 धावांची माबाद खेळी खेळली तर गोलंदाजीत टीम साउथीने भेदक चेंडूचा मारा करत 3 विकेट्स घेतल्या,त्यासोबतच ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
नाणेफेक हारून पहिल्यांदा फलंदाजीस आलेल्या युगांडा टीम 18.4 षटकात फक्त 40 धावा करुन सर्वबाद झाली. यादरम्यान रोनक पटेल आणि सायमन सेसाझी सलामीवीर फलंदाज स्वस्तात बाद झाले. सेसाझी गोल्डन डकवर तंबूत परतला. तर पटेल 2 धांवावर बाद झाला. संघासाठी सर्वाधिक केनेथ वायस्वाने 11 धावा केल्या त्यासाठी तो 18 चेंडूचा सामना केला. दिनेक नाकराणी 4 धावा करून बाद झाला. कर्णधार मसाबा 3 धावा करुन नाबाद राहिला. या सामन्यात न्यूझीलंडने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. टीम साउथीने 4 षटकात केवळ 4 धावा देत 3 गडी टिपले. ट्रेंट बोल्टने 4 षटकात 2 विकेट्स घेतल्या त्याने केवळ 7 धावा दिल्या.
युगांडाने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने 5.2 षटकांत लक्ष्य गाठले. संघाने 88 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या फिन ऍलनने 17 चेंडूत 9 धावा करुन बाद झाला. तर कॉनवे 15 चेंडूत 22 धावा करुन नाबाद राहिला. त्याने 4 चौकार मारले.
न्यूझीलंड आणि युगांडाचे संघ सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या टी20 विश्वचषकात न्यूझीलंडने 3 सामने खेळले आहेत. या दरम्यान संघाने केवळ 1 सामना जिंकला आहे. युगांडाबद्दल बोलायचे झाले तर संघाने 4 सामने खेळले आणि 1 जिंकला. हे दोन्ही संघ क गटात होते. या गटातून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज सुपर-8 पात्र ठरले आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
रोहित शर्मासोबत मतभेद?…म्हणून शुबमन गिलला टीम मॅनेजमेंटनं परत पाठवलं, मिळाली मोठ्या चुकीची शिक्षा
नेपाळचा हार्टब्रेक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या एका धावेनं पराभव
टी20 विश्वचषकातून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला दुहेरी झटका, 2026 च्या स्पर्धेत थेट एंट्री मिळणार नाही!