---Advertisement---

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; महत्त्वाच्या मालिकेपूर्वी स्टार गोलंदाज गंभीर जखमी

On: शनिवार, ऑगस्ट 24, 2024 3:50 PM
Australia-Cricket-Team
---Advertisement---

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बाॅर्डर गावस्कर मालिकेपूर्वी काांगारु संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड मागील आठवड्यात सराव सत्रादरम्यान पायाच्या पिंढरीला दुखापत झाल्यामुळे स्कॉटलंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे.

परिणामी जोश हेझलवूडच्या जागी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी रिले मेरेडिथचा संघात समावेश करण्यात आला आहे. 2021 मध्ये तो या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा सामना खेळला होता. मात्र, हेझलवूडची दुखापत गंभीर नाही. सप्टेंबरच्या अखेरीस इंग्लंड संघाविरुद्धच्या टी20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी तो उपलब्ध असेल असी शक्यता वर्तवली जात आहे.

स्पेन्सर जॉन्सननंतर आता हेझलवूड हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर होणारा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. द हंड्रेडमध्ये खेळताना जॉन्सनला साइड स्ट्रेन झाला. त्याच्या जागी शॉन ॲबॉटला संघात घेण्यात आले होते.

स्कॉटलंड मालिकेसाठी, वेगवान आक्रमणात आता मेरेडिथ, झेवियर बार्टलेट, शॉन ॲबॉट आणि नॅथन एलिस यांचा समावेश असेल. ज्यामध्ये अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी आणि मार्कस स्टॉइनिस हे देखील हातभार देऊ शकतात. कर्णधार मिशेल मार्श देखील योगदान देण्याची शक्यता आहे. ॲडम झाम्पा आणि अनकॅप्ड कूपर कॉनोली स्पीन विभाग पाहतील.

ऑस्ट्रेलियान संघ सप्टेंबरच्या पहिल्या अठवड्यात स्कॉटलंड दाैरा करणार आहे. ज्यामध्ये संघ 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. ज्यामधील पहिला टी20 सामना 04 सप्टेंबर दुसरा आणि तिसरा अनुक्रमे 6  आणि 7 सप्टेंबर रोजी होईल.

ऑस्ट्रेलिया टी20 संघ विरुद्ध स्कॉटलंड
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ऍबॉट, झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), रिले मेरेडिथ, मार्कस स्टॉइनिस, ॲडम जम्पा

हेही वाचा-

जय शहा आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास बीसीसीआयची चिंता वाढणार; जाणून घ्या मोठं कारण
शिखर धवन निवृत्तीनंतरही आयपीएल खेळणार का? गब्बर म्हणाला…
शिखर धवनच्या निवृत्तीनंतर हे 3 खेळाडूही करू शकतात क्रिकेटला अलविदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---