भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 2025 पूर्वी लखनऊ सुपर जायट्ंसने झहीर खानची संघाच्या मेंटाॅरपदी नियक्ती केली आहे. लखनऊ सुपर जायट्ंसने आपल्या अधिकृत खात्यावरुन सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म ‘एक्स’वर व्हिडिओ शेअर करुन ही माहिती दिली आली आहे.
झहीर खान मेंटाॅर झाल्याने लखनऊ संघाला दुहेरी फायदा झाला आहे. मार्गदर्शकासह माजी भारतीय दिग्गज त्याचा गोलंदाजीचा अनुभव संघाच्या गोलंदाजांसोबत शेअर करू शकतो. कारण एलएसजी संघात गोलंदाजी प्रशिक्षकाची उणीव होती. संघाने आता झहीर खानची निवड करुन दुहेरी फायदा करुन घेतला आहे.
Zaheer, Lucknow ke dil mein aap bohot pehle se ho 🇮🇳💙 pic.twitter.com/S5S3YHUSX0
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) August 28, 2024
Welcome to the Super Giants family, Zak! 💙 pic.twitter.com/0tIW6jl3c1
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) August 28, 2024
गाैतम गंभीरने लखनऊची साथ सोडल्यानंतर संघातील मेंटाॅरपद रिकामे होते. त्यासोबतच गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने माॅर्केलने देखील सपोर्ट स्टाफमधून बाहेर पडल्यने लखनऊला मोठ्या खेळाडूच्या मार्गदर्शकाची गरज होती. आता झहीर खानची निवड करुन संघाने मोठी खेळी खेळली आहे. झहीर खानचा अनुभव नक्कीच संघातील खेळाडूंच्या कामी येणार आहे. संघातून बाहेर पडल्यानंतर गाैतम गंभीर आणि मोर्ने माॅर्केल टीम इंडियाशी जोडले गेले आहेत. ज्यामध्ये बीसीसीआयने गाैतम गंभीरकडे हेड कोच तर मोर्ने माॅर्केलकडे गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आले आहे. मात्र, मोर्ने माॅर्केल बांग्लादेश मालिकेपूर्वी टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे.
झहीर खान याआधी मुंबई इंडियन्सचे क्रिकेट संचालक होता. 2018 ते 2022 पर्यंत त्यांनी मुंबई इंडियन्समध्ये क्रिकेट संचालकपद भूषवले आहे. याशिवाय माजी भारतीय गोलंदाज ग्लोबल क्रिकेट डेव्हलपमेंट प्रोग्रामचे प्रमुख देखील होता.
खरं तर, झहीर खानने त्याच्या करिअरमध्ये 100 आयपीएल सामने खेळले. या सामन्यांच्या 99 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 27.27 च्या सरासरीने 102 विकेट घेतल्या. ज्यामध्ये त्याचे सर्वोत्तम 4/17 होते. या दरम्यान त्याने 7.59 च्या इकॉनॉमीवर धावा खर्च केल्या.
हेही वाचा-
जय शाह यांचं एका महिन्याचं वेतन किती? बीसीसीआयमध्ये किती कमाई होत होती?
“40 टक्के सामने खेळले नाहीत आणि आराम…” रोहित-विराटबद्दल माजी खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य
ब्रेकिंग बातमी! आयपीएल 2025 साठी झहीर खानला मिळाली मोठी जबाबदारी, या संघाच्या मेंटॉरपदी वर्णी