आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉट्सन चेन्नई संघाच्या यशाचे कारण सांगताना म्हणाला की, कर्णधार एमएस धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी खेळाडूंबद्दल दाखवलेला विश्वास हेच चेन्नईच्या यशाचे कारण आहे.
वॉट्सनने इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये सांगितले की, “तुम्ही १० सामन्यांमध्ये चांगल्या धावा करत नाही. तरीही तुम्हाला संघात संधी मिळते. मागील मोसमात माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद धोनी आणि फ्लेमिंग. जर तुम्ही चेन्नईऐवजी इतर कोणताही संघ असता तर तुम्ही केव्हाच संघाबाहेर गेला असता. परंतु धन्यवाद की तुम्ही अजूनही संघात आहात.”
वॉट्सन यापूर्वी पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. यानंतर तो आयपीएल २०१८ चे विजेतेपद पटकाविणाऱ्या चेन्नई (Chennai Super Kings) संघाचाही भाग राहिला आहे.
वॉट्सनने (Shane Watson) २०१८मध्ये सनरायजर्स हैद्राबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) अंतिम सामन्यात ५७ चेंडूत ११७ धावांची शतकी खेळी केली होती. यामध्ये त्याने ८ षटकार आणि ११ चौकार ठोकले होते. तसेच चेन्नईला विजेतेपद मिळवून दिले होते. यापूर्वीही मागील मोसमातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) ५९ चेंडूत ८० धावांची उत्कृष्ट खेळी केली होती.
यावेळी वॉट्सन म्हणाला की, “या दरम्यान मला वाटले की, मी चांगली फलंदाजी करत आहे. परंतु धावा करता येत नाहीत. तसेच संघाचे प्रतिनिधित्वही करत होतो. अनेक सामन्यांमध्ये अयशस्वी राहिल्यानंतर मला वाटले की, ते मला संघातून बाहेर काढतील. परंतु त्यांनी तसं काहीही केले नाही. नंतर गोष्टी बदलल्या. त्यामुळे मी धोनी (MS Dhoni) आणि फ्लेमिंग (Stephen Fleming) यांना धन्यवाद द्यायचे आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.”
“नेतृत्वीची हीच खरी ताकद आहे. हे समजण्यासाठी तुम्हाला त्या लोकांसोबत रहावे लागेल, ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. तसेच मी नेहमी त्यांचा ऋणी राहिल,” असेही वॉट्सन पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-चहल म्हणतो, टीम इंडियाचे हे दोन शिलेदार बरोबर असतील तर महिनाभरही राहु शकतो लाॅकडाऊनमध्ये खुश
-जगातील ५ महान गोलंदाज, जे कधीही घेऊ शकले नाहीत वनडेत ५ विकेट्स
-मुंबई ड्रीम ११ टीम इंडियाच्या ऑल टाईम ११पेक्षाही भारी, पहा टीम