निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने यंदाचा आयसीसी अंडर-19 टी20 विश्वचषक जिंकला आहे. विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना भारताने सहज विजय मिळवला आहे. स्पर्धेत भारतीय संघाची मोहीम उत्कृष्ट होती. संघाने स्पर्धेतील सर्व सहा सामने जिंकत जेतेपदावर नाव कोरले आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्यावरच उलटला संघाने दुसऱ्या षटकात 11 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणासमोर आफ्रिकेच्या कोणत्याही फलंदाजाचा टिकाव लागला नाही. संघ सातत्याने विकेट्स गमावत राहिला. परिणामी संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आले नाही. मर्यादित 20 षटकात आफ्रिकेने केवळ 82 धावा केल्या. आफ्रिकेकडून मिके व्हॅन वुर्स्टने सर्वाधिक 23 धावा केल्या. गोलंदाजीत भारताकडून पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा आणि आयुषी शुक्ला यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या.
ICC POSTER FOR WOMEN’S U19 T20 WORLD CUP CHAMPIONS – INDIA. 🇮🇳 pic.twitter.com/QKAkpoWbie
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 2, 2025
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सलामी जोडी यावेळी स्वस्तात बाद झाली. संघाची सलामीवीर कमलिनी 8 धावांवर बाद झाली. यानंतर भारतीय संघाने एकही विकेट गमावला नाही. दुसऱ्या विकेटसाठी गोंगाडी त्रिशा आणि सानिका चाळके यांच्यातील 48 धावांच्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर भारताने सामना सहज जिंकला. सामन्यात भारताकडून गोंगडी त्रिशाने सर्वाधिक 44 धावा केल्या. आशाप्रकारे भारताने दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्स आणि 8.4 षटके राखून विजय मिळवला.
आयसीसी अंडर-19 महिला टी20 वर्ल्डकपच्या ही दुसरी आवृत्तीतही भारताचा दबदबा पाहायला मिळाला. शेवटच्या स्पर्धेत 2023 मध्ये भारतीय संघ शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली विजेता ठरला होता. यावेळी निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजेतेपदावर नाव कोरले आहे. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी शानदार होती. संघाने स्पर्धेतील एकही सामना गमावला नाही.
आयसीसी अंडर-19 महिला वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा प्रवास:
1. वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव
2. मलेशियाविरुद्ध 10 गडी राखून विजय
3. श्रीलंकेचा 60 धावांनी पराभव
4. बांग्लादेशविरुद्ध 8 गडी राखून विजय
5. स्कॉटलंडवर 150 धावांनी विजय
6. उपांत्य फेरीत इंग्लंडवर 9 विकेट्सने विजय
7. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्सने विजय
हेही वाचा-
4 सामन्यात 26 धावा…, सूर्यकुमार यादवला झाले तरी काय? माजी क्रिकेटपटूने दिला मोलाचा सल्ला
U-19 Women’s WC; या वर्षीचा पहिला विश्वचषक आज येणार? जेतेपदसाठी भारत – दक्षिण आफ्रिका समोरासमोर
बीसीसीआय ‘नमन सोहळ्यात’ सरफराज खान चमकला, या मोठ्या पुरस्काराने सन्मानित!