नुकताच न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (NZ vs Ban 2nd test) या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाने जोरदार विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने जोरदार पुनरागमन करत बांगलादेश संघाला १ डाव आणि ११७ धावांनी पराभूत केले आहे. यासह ही मालिका १-१ ने बरोबरीत सुटली आहे.
बांगलादेश संघाने पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघावर ऐतिहासिक विजय मिळवला होता. या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंना पूर्णपणे बॅकफूटवर टाकले होते. या पराभवाचा बदला घेत न्यूझीलंड संघाने बांगलादेश संघावर ३ दिवसात विजय मिळवला आणि व्याजासह परतफेड केली.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना टॉम लेथमने २५२ धावांची खेळी केली होती, तर डेवोन कॉनवेने १०९ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला ५२१ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते.
न्यूझीलंड संघाने दिलेल्या या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला पहिल्या डावात अवघ्या १२६ धावा करण्यात यश आले. त्यानंतर न्यूझीलंडकडून बांगलादेश संघाला फॉलोऑन देण्यात आला होता. पहिल्या डावात न्यूझीलंड संघाकडून ट्रेंट बोल्टने ५, टीम साऊदीने ३ आणि काईल जेमिसनने २ गडी बाद केले होते.
दुसऱ्या डावात जेव्हा बांगलादेश संघ फलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी देखील बांगलादेश संघातील फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. बांगलादेश संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २७८ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या डावात नील वॅगनर आणि काईल जेमिसनने ३-३ गडी बाद केले होते.
हे नक्की पाहा :
हा सामना न्यूझीलंड संघाचा दिग्गज खेळाडू रॉस टेलरच्या कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. त्याने या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर गडी बाद करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर गडी बाद करणारा रॉस टेलर हा जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी फक्त रिचर्ड हॅडली, ग्लेन मॅकग्रा आणि मुथय्या मुरलीधरन सारख्या दिग्गज गोलंदाजांनी ही खास कामगिरी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
महानतेवर शिक्कामोर्तब! रॉस टेलरला अखेरच्या कसोटीत मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’; पाहा भावनिक व्हिडिओ
श्रेयस भूषवणार आयपीएल विजेत्या संघाचे कर्णधारपद? कोट्यवधींची बोली लावण्यासाठी फ्रॅंचाईजी तयार
बिग ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज ख्रिस मॉरिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त