साउथॅम्पटन येथे सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील चौथा दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. साउथॅम्पटन येथे सातत्याने पाऊस सुरू असल्याने मैदान ओले आहे. सामन्याचा पहिला दिवस (१८ जून) देखील याच कारणाने वाया गेला होता. या काळात खेळ होत नसल्याने न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मिळालेल्या मोकळ्या वेळाचा उपयोग विविध कारणांसाठी वापरला.
साउथम्पटन येथे पावसाची संततधार
वेधशाळेने हा ऐतिहासिक सामना सुरू होण्यापूर्वीच साउथॅम्पटन येथे पुढील सहा दिवस पाऊस असणार आहे, असा अंदाज व्यक्त केला होता. त्या अंदाजाप्रमाणे, सामन्याच्या पहिल्या दिवशी मुसळधार पावसामुळे नाणेफेक न करता खेळ रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील केवळ ६४ षटकांचा खेळ झाला. तिसर्या दिवशी मात्र पूर्ण वेळ झाला. परंतु, आज पुन्हा साउथॅम्पटन येथे संततधार पाऊस पडत असल्याने अद्याप खेळ सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही.
न्यूझीलंड खेळाडूंनी असा केला टाइमपास
पावसामुळे चौथ्या दिवशीचा खेळ सुरू होण्यास वेळ लागत असल्याने न्यूझीलंडचे खेळाडू या काळात वेगवेगळ्या प्रकारे टाईमपास करताना दिसून आले. भारताचा पहिला डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा युवा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन हा आपल्या सहकाऱ्यांसोबत टेबल टेनिस खेळताना दिसून आला. त्याचे हे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध होऊ लागले आहे. यापूर्वी देखील सामन्याच्या पहिल्या दिवशी जेमिसनसह टिम साऊदी व मॅट हेन्री हे मोकळ्या वेळात पुस्तके वाचताना दिसून आले होते.
Wet weather has returned to the Hampshire Bowl so it’s table tennis for now…#WTC21 pic.twitter.com/hA0AjPgiya
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 21, 2021
Rain to start in Southampton means coffee and a chat watching the covers to start the day. #WTC21 pic.twitter.com/dLhbAd5C4l
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 18, 2021
तर दोन्ही संघ होणार संयुक्त विजेते
कसोटी क्रिकेटचा १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील विजेत्याला तब्बल ११ कोटी रुपयांची रक्कम बक्षिस म्हणून मिळणार आहे. मात्र, सामन्याचा निकाल न लागल्यास दोन्ही संघांना संयुक्तरीत्या विजेते घोषित करण्यात येईल. सामन्यात आत्तापर्यंत तीन दिवसात केवळ १४१.१ षटके खेळ झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी क्रिकेटमध्ये का आहे अश्विन सर्वोत्तम गोलंदाज? बुमराहने सांगितले कारण
“अंतिम सामन्यात दोन फिरकीपटू खेळवणे योग्यच”, माजी क्रिकेटपटूने केले भारताच्या निर्णयाचे समर्थन