रशियात सुरू असलेला फिफा विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. आजपासून विश्वचषकाच्या उपांत्य पूर्व फेरीचे सामने सुरू होत आहेत.
१५ जूनपासुन सुरू झालेल्या या विश्वचषकात मैदानात आणि मैदानाबाहेर अनेक घडामोडी घडल्या आहेत.
यामध्ये मैदानावरील खेळ आणि असभ्य वागणुकीसाठी प्रसिद्ध असलेला ब्राझीलचा नेमार पुन्हा चर्चेत आला आहे.
नेमारने ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत पोहचवण्यात महत्त्वाची भुमिका निभावली असली तरी त्याने खेळलेल्या फिफा विश्वचषकातील चार सामन्यात मिळुन तब्बल १४ मिनिटांचा वेळ बरबाद केला आहे.
नेमारने बाद फेरीच्या सामन्यात मेक्सिको विरुद्धच्या सामन्यात ५ मिनिटे २९ सेकंद, गट फेरीच्या सर्बिया विरुद्धच्या सामन्यात १ मिनिट ५६ सेकंद, स्वित्झर्लंड विरुद्धच्या सामन्यात ३ मिनीटे ४० सेंकंद आणि इतर असा मिळून जवळपास १४ मिनिटाचा खेळ वाया घालवला आहे.
ब्राझीलने खेळलेल्या चार सामन्यात नेमारने २३ फाऊल केले आहेत.
मैदानावर नाटकं करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नेमारने या स्पर्धेत आपल्या संघासाठी २ गोल आणि चांगली कामगिरी केल्याने नेमारचे हे कृत्य झाकून गेले आहे.
मात्र एका स्विस क्रिडा वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात हे उघड झाले आहे की नेमार ने चार सामन्यात मिळुन १४ मिनिटे बरबाद केली आहेत.
तसेच मैदानावर पडून नाटके करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नेमारची या विश्वचषकातही त्याची मैदानावरील वर्तणूक कायम आहे.
बाद फेरीच्या मेक्सिको विरुद्धच्या सामन्यातही नेमारने केलेल्या असभ्य वर्तणूकीमुळे जगभरातील फु़टबॉल चाहत्यांनी त्याची सोशल मिडीयाच्या माध्यमातून चांगलीच खरडपट्टी केली होती.
मात्र नेमारच्या खेळातील कौशल्याने आणि ब्राझीलने उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केल्याने त्याच्या या कृत्याकडे सर्वांनीच डोळेझाक केली आहे.
आज गुरवारी (६ जुलैला) ब्राझीलचा उपांत्य पूर्व फेरीचा सामना बेल्जिअम विरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘बाप योगायोग’- फिफा विश्वचषकात जुळून आलायं अनोखा योगायोग
-फिफा विश्वचषक: बेल्जियम विरुद्ध ब्राझील…आज चुकीला माफी…