कोलकाता नाईट राडयर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील शनिवारचा (20 मे) सामना चांगलाच रोमांचकर झाला. रिकू सिंग याने केकेआरच्या विजयासाठीच्या अपेक्षा शेवटच्या षटकापर्यंत कायम ठेवल्या. मात्र, पूर्ण प्रयत्न करून देखील तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. तत्पूर्वी, लखनऊ संघासाठी पुन्हा एकदा निकोलस पूरन हाच धावून आला. हंगाम सुरू होण्याआधी संघाचा मेंटर गौतम गंभीर या नेत्याच्यावर दाखवलेल्या विश्वास त्याने आत्तापर्यंत तरी सार्थ ठरवला आहे.
आयपीएल 2023 च्या लिलावा आधी सनरायझर्स हैदराबादने पूरनला रिलीज केले होते. त्यानंतर लखनऊने त्याला तब्बल 16 कोटींची मोठी रक्कम देत आपल्या संघात सामील करून घेतले. त्यावेळी अनेकांनी या निर्णयावर टीका केलेली. मात्र, गंभीरने या निर्णयाची पाठराखण करताना, तो एक शानदार खेळाडू असून अनेकांनी त्याचा योग्य वापर केला नाही, असे वक्तव्य केले होते. तसेच, तो लखनऊ संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केलेली. गंभीर्याचा हाच विश्वास त्याने आता योग्य ठरवला.
पूरनने संघाला ज्यावेळी गरज आहे त्यावेळी आपल्या स्फोटक खेळाचे दर्शन घडवले. आयसीसी विरुद्धच्या सामन्यात 213 धावांचा पाठलाग करताना त्याने 15 चेंडूवर अर्धशतक पूर्ण केलेले. त्यानंतर हैदराबाद विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने 15 चेंडूवर नाबाद 44 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. आता अखेरच्या सामन्यातही संघाची गरज ओळखून त्याने 30 चेंडूवर 58 धावा काढल्या.
या संपूर्ण हंगामाचा विचार केल्यास त्याने 14 सामने खेळताना 358 धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 32 व स्ट्राईक रेट 173 इतका मोठा राहिलेला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 26 षटकार निघाले. आता एलिमिनेटर व पुढील सामन्यांमध्ये देखील त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा लखनऊ संघाला असेल.
(Nicholas Pooran Pay Back Gautam Gambhir Trust In IPL 2023 For Lucknow Supergiants)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 4 वर्षांनंतर रिंकूने केला मोठा विक्रम, रोहित तर सोडाच; धोनी अन् डिविलियर्सलाही टाकलं मागे