---Advertisement---

WI vs IND | निकोलस पूरनची जडेजालाही लाजवेल अशी फिल्डिंग, व्हिडिओ पाहून व्हाल चकित

On: मंगळवार, जुलै 26, 2022 1:08 PM
nicholas-pooran
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानात कोणत्याही संघासाठी फलंदाज आणि गोलंदाजाची भूमिका जेवढी महत्वाची असते, तेवढीच महत्वाची असेत क्षेत्ररक्षकाची भूमिका. उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर क्रिकेट जगतात यापूर्वी अनेक दिग्गजांनी नाव कमावले आहे आणि अजूनही अनेक खेळाडू असे प्रदर्शन करत आहेत. भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनेड सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार निकलोस पूरनने अशाच प्रकारच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा एक नमुना सादर केला. 

भारताविरुद्धच्या या दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडीज संघाला २ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला, परंतु त्यांचा २६ वर्षीय कर्णधार निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने जबरदस्त प्रदर्शन केले. सामन्यातील एक व्हिडिओ वेस्ट इंडीज क्रिकेटच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला गेला आहे. व्हिडिओत पूरनने एक जबरदस्त डाईव्ह मारून चेंडू रोखल्याचे दिसत आहे. चेंडू पकडल्यानंतर देखील त्याने क्षणाचाही विलंब न करता तो यष्टीरक्षकाकडे फेकल्याचे देखील व्हिडिओत पाहिले जाऊ शकते. पूरनने दाखवलेल्या या चपळाईसाठी चाहत्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

https://www.instagram.com/reel/CgaMIjoA5PV/?utm_source=ig_web_copy_link

क्षेत्ररक्षण करताना पूरनने ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले, अगदी त्याच पद्धतीचे प्रदर्शन त्याने फलंदाजी करताना देखील केले. नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पूरनने ७७ चेंडूत ७४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली, ज्यामध्ये १ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याने शाई होवसोबत मिळून शतकीय भागीदारी देखील केली. होपने या सामन्यात सर्वाधिक ११५ धावांचे योगदान दिले. हा त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १०० वा सामना होता, ज्यामध्ये त्याने शतक ठोकले.

फलंदाजांच्या या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर वेस्ट इंडीजने भारतासमोर ३१२ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य ४९.४ षटकात आणि ८ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. श्रेयस अय्यर (६३) आणि संजू सॅमसन (५४) यांच्या वैयक्तिक अर्धशतकांमुळे भारतीय संघाचा विजय सोपा बनला. तत्पूर्वी उभय संघातील पहिला वनडे सामना २२ जुलै रोजी खेळला गेला होता, जो भारताने ३ धावांच्या अंतराने नावावर केला होता. आता उभय संघातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (२७ जुलै) खेळला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

तिसऱ्या वनडेत धवन दाखवणार पावर, बाउंड्रीवर बाउंड्री मारत विश्वविक्रम करणार नावावर!

कॉमनवेल्थ गेम्स २०२२साठी भारताचा संघ बर्मिंघममध्ये दाखल, पाहा संपूर्ण स्केड्यूल एका क्लिकवर

फक्त कौतुक करावे असे यश! वयाच्या १८व्या वर्षी टी२०मध्ये शतक ठोकत ‘या’ क्रिकेटरने केला विश्वविक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---